Viral Video: लाइक्ससाठी आधी कुत्र्याला लाथ मारली,शिव्या दिल्या अन् मग माफी मागितली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: लाइक्ससाठी आधी कुत्र्याला लाथ मारली,शिव्या दिल्या अन् मग माफी मागितली...

Viral Video: लाइक्ससाठी आधी कुत्र्याला लाथ मारली,शिव्या दिल्या अन् मग माफी मागितली...

काजल किरण नावाच्या कथित इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा कुत्र्याशी गैरवर्तन करतांनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काजलच्या इस्टां अकाऊंटवरून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता आणि त्याच्या जागी कुत्र्यांना खायला घालतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता पण तो व्हिडिओ अजूनही ट्विटरवर दिसत आहे. हे पाहिल्यानतंर युजर्स तिच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.(Instagram influencer Kajal Kiran kicking a stray dog and laughing)

काजलचे इंस्टाग्रामवर जवळपास 1 लाख 21 हजार फॉलोअर्स आहेत. तिचा कुत्र्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काजल किरणच्या इतर व्हिडिओंवरही लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिने माफी मागितली. व्हिडिओवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काजलने माफी मागितली आहे. आपण प्राणी प्रेमी असल्याचं तिने या व्हिडिओ संदेशाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्यासाठी असभ्य भाषेचा वापर करण्याबाबत ती म्हणाली की, दिल्ली-मुंबईत अशी भाषा सर्रास चालते.

किरणने तिच्या सोशल मिडियातून हा व्हिडिओ डिलिट केला आणि माफी मागितली. व्हिडिओमध्ये तिने दावा केला आहे की ती एक प्राणी प्रेमी आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "हाय मित्रांनो, माझ्या क्रूर कृत्याबद्दल मला खेद वाटतो, मला माझ्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाला आणि मी कोणत्याही प्राण्याला इजा न करण्याची शपथ घेते".

हेही वाचा -आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

इतकच नाही तर तिने माफी मागण्यासाठी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, ती कुत्र्यांना राहण्यासाठी बिस्किटे खायला घालताना दिसत आहे आणि ती एक प्राणी प्रेमी आहे आणि आयुष्यभर चांगली कामे करत आहे, आणि "एक चूक " केल्याबद्दल लोकांनी क्षमा केली पाहिजे.असं म्हटली आहे.