Sonam Kapoor trolled: "सोनम हा जॅकेट आहे की तंबू", झाली ट्रोल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor

Sonam Kapoor trolled: "सोनम हा जॅकेट आहे की तंबू", झाली ट्रोल...

बॉलिवूडमध्ये फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. असं म्हणातात की, ती कुण्या फॅशन डिझायनरकडून तिचे कपडे तयार करून न घेता स्वतःच तयार करते. तिच्या फॅशनची बरीच चर्चा असते. अनेक जण तिला फॅशन आयकॉनही म्हणतात. तिने डिझाईन केलेले कपडे अनेकदा खूप वेगळे आणि विचित्र असतात. तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे ती नेहमी चर्चेत असते. काहीवेळा तिच्या कपड्यांमुळे ती ट्रोलही झालेली आहे. 

बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह आहे. मध्यंतरी सोनमने मॅटरनिटी फोटो शुट केले त्यावेळीही तिला जबरदस्त ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्यातच आता सोनम कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिला पापाराझींनी एअपोर्टवर स्पॉट केलं. ‌या व्हिडिओमध्ये सोनम गाडीतून उतरत आहे. तिने स्किनी कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ती यात सूंदर दिसतेय. मात्र तिने जो जॅकेट घातला त्याची खरी चर्चा होत आहे. नक्की सोनमला घालायचे काय होते आणि तिने हे का घातले असा प्रश्न युजर्सना पडला आहे? तिच्या या जॅकेट वरून सोनम ट्रोलिंच्या जाळ्यात सापडली आहे.

हेही वाचा -आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

एका युजर्सने लिहिले " सोनम हा जॅकेट आहे की तंबू" तर एकांन लिहिलयं " हिने तर आपल्याच कारच्या कव्हरच जॅकेट बनवलं की काय?" एकाने लिहिलयं, "सोनम कोरोना गेला अजुनही पीपीइ किट का घालतले आहे" अशा भन्नाट कमेंट तिच्या व्हिडिओला येत आहेत.