संगीतप्रधान चित्रपटात इरफान

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खानचा नेहमीच विविध भूमिका करण्याकडे कल असतो. बॉलिवूडसह त्याने हॉलिवूडमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या आगामी "द सॉंग ऑफ स्कॉर्पियन' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चालू आहे.

या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच गाण्याचे स्थानिक संगीतकारांबरोबर जैसलमेरच्या मरूस्थलमध्ये लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले. इरफानबरोबर या चित्रपटात अभिनेत्री - संगीतकार गोल्शीफतेह काम करीत आहे.

इरफान एका उंट व्यापाऱ्याच्या भूमिकेत आहे; तर गोल्शीफतेह कोणत्याही रोगावर, जखमेवर संगीताने उपचार करणाऱ्या एका महिलेची भूमिका करत आहे. चित्रपटात सात गाणी आहेत. इरफानला संगीतप्रधान चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली.

Web Title: irfan khan to lead in musical film