"गुस्ताखियां'मधून इरफान खान बाहेर 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्सालीचा आगामी चित्रपट "गुस्ताखियां' हा साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या नातेसंबंधावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलीवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा व अभिनेता इरफान खान प्रमुख भूमिकेत आहेत; परंतु इरफान खानने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रीकरणाच्या तारखांची अडचण होत असल्याचे सांगून इरफान या चित्रपटातून बाहेर पडला आहे. सूत्राच्या माहितीनुसार संजयला हा चित्रपट प्रियंकालाच घेऊन बनवायचा आहे; परंतु ती हॉलीवूडमध्ये व्यग्र असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत नाही आहे. त्यामुळे इरफान खूप नाराज झाला आहे. त्यामुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे बोलले जात आहे.

इरफानने हा चित्रपट करावा, यासाठी संजयकडून त्याची सध्या मनधरणी सुरू आहे. सोबत नवीन नायकाचा शोधही सुरू आहे. आता इरफानच्या जागी अभिषेक बच्चनची वर्णी लागेल, असेही बोलले जात आहे. आता साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेत कोणाची वर्णी लागेल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

Web Title: Irfan Khan out of 'gustakhiyan'