irrfan khan
irrfan khan

अभिनेता इरफान खान प्रकृती खालावल्याने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मुंबई- बॉलीवूड अभिनेता इरफान खानची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं आहे. सुत्रांच्या माहीतीनुसार मंगळवारी सकाळी इरफान बाथरुममध्ये पडला होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तसंच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्याने केली होती. म्हणूनंच त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. अजुनतरी इरफानच्या प्रकृतीविषयी जास्त माहिती मिळू शकलेली नाही आणि त्याच्या कुटुंबियांकडूनही अधिकृतरित्या खरं कारण समजू शकलेलं नाही. 

काही दिवसांपूर्वीच इरफानची आई सईदा बेगम यांच जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आणि प्रकृती ठीक नसल्याने इरफान जयपूरला जाऊ शकला नाही. इरफानने व्हिडिओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्याच्या नातेवाईकांशी तो बोलला. 

२ वर्षांपूर्वी इरफानला त्याच्या आजाराविषयी कळालं होतं

दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजारपणाविषयी कळालं होतं. त्याने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. इरफानने ट्वीट करत लिहिलं होतं, ''आयुष्यात अचानक असं काही होतं जो तुम्हाला खुप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात गेले काही दिवस असंच काहीसं सुरु आहे. मला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला आहे. मात्र माझ्याजवळ असलेल्या लोकांचं प्रेम आणि ताकदीने माझ्यात नवी उमेद जागी केली आहे.''

इरफानला त्याच्या आजारपणाचं कारण कळताच तो त्यावर उपचार घेण्यासाठी लंडनला गेला होता. तिथे त्याने एक वर्ष उपचार केल्यानंतर २०१९मध्ये तो भारतात परत आला होता. 

२०१९मध्ये उपचार करुन भारतात परतेला इरफान

लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता. मात्र लॉकडाऊन जाहीर करण्याच्या दोन दिवस आधीच सिनेमा रिलीज झाल्याने बॉक्स ऑफीसवर कमाई करु शकला नाही. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी इरफानने हा सिनेमा त्याच्यासाठी खूप खास असल्याचं म्हटलं होतं.  

irrfan khan health condition today latest news updates from kokilaben hospital in mumbai  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com