एवढे कोटी मिळत असून देखील रणवीर सिंगचा '८३' सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्याला कबीर खानचा नकार

ranveer
ranveer

मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा ८३ हा सिनेमा कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे अनिश्चित वेळेसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात रणवीर सिंगने कपिल देवची मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा या वर्षातला मोस्ट अवेटेड सिनेमा होता.

याचदरम्यान अशी माहिती मिळत आहे की ओटीटी प्लॅटफॉर्म ८३ सिनेमाच्या डिजीटल रिलीजसाठी सिनेमाच्या निर्मात्यांना करोडो रुपये देण्यासाठी तयार आहेत. व्यापरतज्ज्ञांच्या माहितीनुसार हा सिनेमा थिएटरमध्ये ३०० करोडपेक्षा जास्त कमाई करेल. या सिनेमाचे निर्माते कबीर खान यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की या सिनेमाला सरळ सरळ डिजीटलवर रिलीज करण्यासाठी त्यांना खूप मोठी रक्कम ऑफर केली जात आहे. मात्र त्यांनी सरळ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या पडद्यावरंच रिलीज करणार असल्याचं सांगितलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by 83 (83thefilm) on

याबाबतील अधिक माहिती देत कबीर खान म्हणाले, ८३ हा असा सिनेमा आहे जो खासकरुन मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठीच बनवला गेला आहे. आम्ही ही परिस्थीती पूर्ववत येईपर्यंत थांबण्यासाठी तयार आहोत. जेव्हा सगळं काही सुरळीत होईल तेव्हा आम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करु. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#CricketWorldCup #History #Entertainment

A post shared by 83 (83thefilm) on

रिलाईंस एंटरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ शिबाशीश सरकार यांनी याआधीच स्पष्ट सांगितलं होतं की हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा आमचा कोणताही प्लॅन नाही आहे. ८३ या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पदूकोण साकारत आहे. हा सिनेमा १९८३मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय दाखवत आहे..  

kabir khan denies direct online release of ranveer singh 83 despite otts offering record price  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com