
'त्याला बेड मिळाला कुठे?, कारण तो छोटा राजन नाही...'
मुंबई - देशात कोरोनाचा कहर वाढतो आहे. त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला असून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. कोरोनातून उभारी घेण्याचा नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत. आता बॉलीवूडमधील सेलिब्रेटी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कोरोनानं सर्वांपुढे गंभीर प्रश्न पडले आहेत. या भयानक आजाराला सामोरं जाताना डोकेदुखी आणखी वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वेगळा अनुभव प्रसिध्द दिवंगत अभिनेता इरफान खानच्या पत्नीला बसला आहे. तिनं सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे. तिच्या त्या पोस्टला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.
इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर यांनी सांगितले की, माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले करण्यात आले होते. मात्र व्यवस्थेनं त्याचा बळी घेतला असे सांगता येईल. सध्याच्या घडीला कोरोनाचा कहर वाढतो आहे. त्याच्याशी दोन हात करताना सगळ्यांची तारांबळ उडते आहे. हे सर्वांना माहिती आहे. असे असतानाही एकुण जी व्यवस्था आहे त्याच्या दुरावस्थेलाही तोंड द्यावे लागत आहे. आता अनेक क्षेत्रातील व्यक्ती मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र एकुण व्यवस्था कशाप्रकारे ढेपाळलीय. त्याचा प्रत्यय दिसून आला आहे.

sutapa post
माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला वेगळ्या अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. गैरव्यवस्थेचा फटका त्याला बसला आहे. त्यामुळे त्याचा जीव गेला आहे. यासगळ्या प्रकाराला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. याविषयावर सुतापा यांनी एक पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर त्यांची ती लांबलचक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात त्यांनी राजधानी दिल्लीतील परिस्थितीविषयी भाष्य केलं आहे.
सुतापा यांनी म्हटलं आहे की, मी समीरच्या चेह-यावरील हास्य कधीही विसरु शकणार नाही. मला नेहमी वाईट वाटत राहिल ते म्हणजे त्याच्यासाठी मला बेड मिळाला नाही. कारण तो छोटा राजन नाही. तो एक प्रामाणिक माणुस आहे. हे सगळं मी विसरणार नाही.
Web Title: Irrfan Khan Wife Sutapa Sikdar Relative Died Of Covid 19 Relative Raged On The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..