बाप-लेकीचं नातं आणि इरफानच्या इंग्रजीची कॉमेडी, पाहा ‘अंग्रेजी मीडियम’चा ट्रेलर

वृत्तसंस्था
Friday, 14 February 2020

इरफान खान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत आहे. त्यानंतर आता तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.  त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. पाहा 'अंग्रेजी मीडियम' चा दमदार ट्रेलर. 

मुंबई : 2020 हे वर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खूप खास आहे. या वर्षात अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. इरफान खान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत आहे. त्यानंतर आता तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.  त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. पाहा 'अंग्रेजी मीडियम' चा दमदार ट्रेलर. 

वयाच्या 14 व्या वर्षी बनली अभिनेत्री, सर्वात सुंदर मधुबालाचं प्रेम ठरलं अपयशी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Yogi aur Jaya ko pyaar dene ke liye dhanyawad 

A post shared by Irrfan (@irrfan) on

इरफानच्या या सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्याचा पोस्टर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ट्रेलरसाठी उत्सुकता होती. अखेर ट्रेलर रिलिज झाला असून प्रेक्षकांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 

संपूर्ण ट्रेलर हा 2 मिनिटे 55 सेकंदांचा आहे. ट्रेलरची सुरुवात एका शाळेपासून होते. ज्यामध्ये इरफानची मुलगी राधिका मदन हि हुशार असल्याने तिचा शाळेमध्ये गौरव करण्यात येतो. राधिका अभ्यासात हुशार असल्याने तिला परदेशात शिकायला जाण्याची इच्छा असते. ही इच्छा ती वडिल इरफानला सांगते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इरफान  प्रयत्न करत असतो. या कॉमेडी चित्रटात करिना कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा इमोशनलसोबतच कॉमेडी असणार आहे हे  ट्रेलरवरुन स्पष्ट झाले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Are you coming ? #lifeiswaiting @qqsthefilm pic by @omkar.kocharekar

A post shared by Irrfan (@irrfan) on

चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे. नुकताच इरफानने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या क्षणचित्रांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत इरफानने त्याच्या आवाजात एक संदेश रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ चाहत्यांसाठी होता. इरफान अद्यापही पूर्णपणे बरा न झाल्याने उपचारासाठी तो लंडनला जाणार आहे. त्यामुळे तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी येऊ शकणार नसल्याची माहिती या व्हिडीओतून त्याने दिली. इरफानच्या आवाजातील हा व्हिडीओ प्रचंड इमोशनल असल्याने चाहत्यांना भावूक केलं आहे. या व्हिडोला भरपूर व्ह्यूज आले आणि सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला. 

Valentine Special : विराट-अनुष्का लहानपणीच पडले होते प्रेमात, खास व्यक्तीने सांगितलं सिक्रेट !

हा चित्रपट २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये इरफानसोबत करीना कपूर खान आणि राधिका मदन दिसणार आहेत. शिवाय इतर कलाकार मंडळीही झळकणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrfan Khans Angrezi Medium trailer is out