रॉक ऑन 2 पडल्याची श्रद्धा कपूरला खंत

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली -  रॉक ऑन - 2 या म्युझिकल चित्रपटात श्रद्धा कपूरने एका गायिकेची भूमिका केली आहे. वेगळ्या धाटणीचा चित्रपट असुनही आणि पहिल्या चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता बघता हा चित्रपट मात्र प्रक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. याची खंत श्रद्धा कपूरने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

2008 मध्ये आलेल्या रॉक ऑन चित्रपटाचा हा सिक्वल असून, पहिल्या चित्रपटाने मात्र तरुणाईला चांगलीच भूरळ घातली होती. या चित्रपटातील वेगळ्या धाटणीची गाणी देखील गाजली. त्यामुळे या चित्रपटाचे संगीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले अशी अपेक्षा होती. 

रॉक ऑन- 2 ला मात्र प्रेक्षकांची पसंती न मिळाल्याने श्रद्धा कपूर नाराज झाली आहे. आपण प्रत्येक चित्रपटासाठी मेहनत केलेली असते आणि वेळही दिलेला असतो. मग अशा वेळी प्रेक्षकांची दाद मिळाली नाही तर दु:ख तर होणारच अशी खंत तीने व्यक्त केली आहे.

Web Title: It's sad that the film has not done well, says Shraddha Kapoor on 'Rock On 2' debacle

टॅग्स