esakal | 'कुमार सानूचा मुलगा म्हणून काम दिले नाही', जानचा धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

'कुमार सानूचा मुलगा म्हणून काम दिले नाही', जानचा धक्कादायक खुलासा

'कुमार सानूचा मुलगा म्हणून काम दिले नाही', जानचा धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू (kumar sanu) यांचा मुलगा जान सानू (jaan sanu) 'बिग बॉस- 14' या शोमुळे चर्चेत आला. शोमध्ये असताना जान सानूने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जानने त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांबद्दल सांगितले.(jaan kumar sanu says he was rejected because he is son of kumar sanu)

मुलाखतीमध्ये आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल जानने सांगितले, 'मला असे वाटते की मी कुमार सानू यांचा मुलगा असल्याने इतर लोकांपेक्षा आयुष्यात दुप्पट संघर्ष करत आहे. लोकांना वाटते की मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलो. त्यामुळे माझ्यासाठी सगळं काही सोप्प आहे. पण असं अजिबात नाहीये. अनेक लोकांना वाटतं की माझे वडिल गायक असल्याने मला खूप काम मिळते. त्यामुळे ते असा विचार करतात की माझ्याऐवजी इतर कोणाला तरी काम देऊन त्यांची मदत करावी, लोकांच्या या विचारामुळे मला अनेक वर्ष काम मिळाले नाही.'

पुढे जान म्हणाला, 'लोकांनी अनेक वेळा माझं गाणं ऐकण्याच्या आधीच मला रिजेक्ट केलं. मी यासर्व गोष्टींच्या विरोधात लढत आहे. मी स्वत:चे मत लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.'

हेही वाचा: 'तर तुझ्या मुलांना शाप लागेल'; मुलांना ट्रोल करणाऱ्याला लिसाचं उत्तर

काही दिवसांपूर्वी जानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याची आई जेव्हा गरोदर होती तेव्हाच त्याचे आई-वडिल विभक्त झाले. त्यामुळे त्याने वडिलांची कधीच मदत घेतली नाही. याविषयी तो म्हणाला, 'माझे वडिल माझ्या जिवनाचा कधीच भाग नव्हते. मला त्यांनी गाण्यासाठी कधीच सपोर्ट केला नाही.'

हेही वाचा: संकर्षण कऱ्हाडे झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म

loading image
go to top