esakal | 'तर तुझ्या मुलांना शाप लागेल'; मुलांना ट्रोल करणाऱ्याला लिसाचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'तर तुझ्या मुलांना शाप लागेल'; मुलांना ट्रोल करणाऱ्याला लिसाचं उत्तर

'तर तुझ्या मुलांना शाप लागेल'; मुलांना ट्रोल करणाऱ्याला लिसाचं उत्तर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री लिसा हेडन (lisa haydon) आणि तिचा पती डिनो लालवानी यांच्या घरी तिसऱ्या चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. लिसा सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती नेहमी शेअर करत असते. नुकतीच एका फेअरनेस क्रिमला प्रमोट करणारी पोस्ट लिसाने सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या या पोस्टला एका नेटकऱ्याने कमेंट करून तिला ट्रोल केले आहे. (actress lisa haydon give answer to troller who said her baby will be cursed)

लिसाच्या पोस्टला एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'लिसा हेडन, केमिकल विकून लोकांचं आयुष्य बर्बाद करू नकोस. लोकांना मूर्ख बनवशील तर तुझ्या मुलांना शाप लागेल,' या कमेंटवर लिसीने 'वा!' असे उत्तर दिले. लिसाच्या या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधले. लिसा नेहमी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असते.

हेही वाचा: उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल

लिसाने २०१० मध्ये 'आएशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'क्वीन' या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. यामध्ये तिने कंगना राणावतच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहायक्क अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. त्यानंतर 'हाऊसफुल ३' आणि 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. अभिनेत्रीसोबतच लिसा मॉडेल म्हणून फार प्रसिद्ध आहे. 'हार्पर बझार', 'ग्रेझिया', 'कॉस्मोपॉलिटन', 'वोग इंडिया', 'फेमिना इंडिया' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या कव्हरसाठी तिने फोटोशूट केलंय. 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल' या शो मध्ये लिसा परिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसली होती.

हेही वाचा: 'फ्रेंडशिप डे'ला RRR ची 'दोस्ती' व्हायरल, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव

loading image
go to top