जाता जात नाही 'जात' साली अवधूतचं रॅप एकदम कडक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

भारतीय समाज रचनेची जी जडण घडण तयार झाली त्याचा पाया प्रामुख्यानं जात होता. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण झाले. यासगळ्यात एक वर्ग कायम वंचित राहिला. त्याला नेहमीच प्रस्थापितांनी तयार केलेल्या जाचक नियम आणि अटींना तोंड द्यावे लागले. जातपातीला कडाडून विरोध करुन एक आदर्श समाज तयार करण्याचे काम केलं. यात साहित्य, कला, यांच्या माध्यमातून जनजागृती केली.

मुंबई - भारतीय समाज रचनेची जी जडण घडण तयार झाली त्याचा पाया प्रामुख्यानं जात होता. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण झाले. यासगळ्यात एक वर्ग कायम वंचित राहिला. त्याला नेहमीच प्रस्थापितांनी तयार केलेल्या जाचक नियम आणि अटींना तोंड द्यावे लागले. जातपातीला कडाडून विरोध करुन एक आदर्श समाज तयार करण्याचे काम केलं. यात साहित्य, कला, यांच्या माध्यमातून जनजागृती केली. 

समाजातील अनिष्ठ, रुढी, परंपरा यांना तितक्याच सक्षमपणे उत्तर देण्यासाठी पोवाडे, जलसे, कविता, वैचारिक लेखन तसेच व्याख्यानमालेचा आधार घेतल्याचे दिसून येते. २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असतानाही अद्याप जातीच्या नावावर अत्याचार करणा-यांची संख्या काही कमी झालेली नाही. अशा सगळ्या परिस्थितीवर मराठीतील प्रसिध्द संगीतकार अवधूत गुप्ते याने एक रॅप साँग तयार केलं आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी व्हायरल झालेल्या या गाण्याला आतापर्यत हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. जात-पात यावर मार्मिकपणे भाष्य करणारे मराठीतले पहिले रॅप साँग म्हणूनही या गाण्याचा उल्लेख करता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अवधूत गुप्तेनी गायलेल्या या गाण्याची निर्मिती ही सागरिका म्युझिकनं केली आहे. समीर सामंत यांनी या गाण्याला शब्दबध्द केलं आहे. त्याला विक्रम बाम यांचे संगीत आहे. या गाण्याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अवधूत म्हणाला की, समाजात इतर कुठल्याही जातींपेक्षा माणुसकी हीच सर्वात महत्वाची जात आहे. आपल्याला त्याचा नेहमी विसर पडतो. माणुसकीला प्राधान्य द्यावे हा विषय या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आला आहे. अनेकांना गाण्यासाठी मी हाच विषय का निवडला हा प्रश्न पडला असेल, त्यावर माझे उत्तर असे की, आपण आजूबाजूला पाहिलं तर अद्याप जातीविषयक अनेक गोष्टी सातत्यानं समोर येताना दिसतात. ज्यावरुन वाद निर्माण होतो. आजवर गाण्याचे वेगवेगळे फॉर्म गायले आहेत. तरीही काही राहून जात असल्याची खंत मनात होती. जे मनात होतं ते यानिमित्तानं गाण्याचा प्रयत्न केला आहे.

'कुछ कुछ होता है' फेम छोटा सरदार परझान अडकला विवाहबंधनात, पारसी रितीरिवाजात केलं लग्न

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय समर्पकपणे एक सकारात्मक विचार लोकांपर्यत पोहचविण्यात आला आहे. त्यातील शब्द, लय ही कमालीची भावणारी आहे. विशेष म्हणजे गाण्यासाठी वस्तुस्थितीला आधारुन संदर्भ घेण्यात आले असल्याने हे गाणे कमालीचे लोकप्रिय झाले आहे. यापूर्वी अवधूतचं ‘ऐका दाजीबा’, ‘मधुबाला’ अशी अनेक गाणी गाजली आहेत. ‘झेंडा’, ‘कान्हा’, ‘बॉइज’, ‘रेगे’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘मोरया’ असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.

'वेळच ठरवेल शेतक-यांच्या बाजूनं आणि विरोधात कोण आहे ते'

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaat new rap song spontaneous songs of avadhoot gupte video viral