Jackie Shroff: अनवाणी गेले अन्..., जग्गूदादांच्या रामभक्तीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ व्हायरल

जॅकी श्रॉफ यांची निस्सिम रामभक्ती सर्वांना दिसून येतेय.
Jackie Shroff viral video of Ram Bhakti that he goes ayodhya barefoot Video Viral
Jackie Shroff viral video of Ram Bhakti that he goes ayodhya barefoot Video ViralSAKAL

Jackie Shroff at Ayodhya Ram Mandir: काल 22 जानेवारी 2024 रोजी देशाने अयोध्येतील राम मंदिराची आतुरतेने वाट पाहत असलेला भव्य अभिषेक सोहळा पाहिला.

प्रख्यात बॉलीवुड स्टार्ससह असंख्य भारतीय सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शान वाढली. या सोहळ्याला जॅकी श्रॉफसुद्धा उपस्थित होते. जॅकी यांनी अशी या सोहळ्यासाठी एक गोष्ट केली त्यामुळे त्यांचं कौतुक होतंय.

Jackie Shroff viral video of Ram Bhakti that he goes ayodhya barefoot Video Viral
Fighter Movie: रिलीजआधीच हृतिकचा 'फायटर' अडकला सेन्सॉरचा कात्रीत, करणार हे मोठे बदल?

जॅकी श्रॉफ अयोध्येतून परत आले अन्...

अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर जॅकी श्रॉफ मुंबईला परतले. त्यांनी प्रभू रामाची मुर्ती त्यांच्यासोबत आणली.

यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होता. विवेकने पापाराझींना सांगितले की, जॅकी श्रॉफ कार्यक्रमाला अनवाणी गेले अन् अनवाणी परत आले."

हे ऐकताच पापाराझींनी जग्गूदादांचं कौतुक केलं. जग्गूदादांनी सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

जॅकी श्रॉफ यांनी मुंबईतील राम मंदिराच्या पायऱ्या धुतल्या

राम मंदिर सोहळ्याआधी जॅकी श्रॉफ मुंबईतील प्रभू राम मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ करताना दिसले. जॅकी श्रॉफ राम मंदिराच्या आवारात काळजीपूर्वक कचरा गोळा करताना आणि मंदिर परिसर धुण्याच्या कामात मग्न होताना दिसले.

याशिवाय काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या अभिषेक समारंभासाठी असंख्य मंत्री आणि सेलिब्रिटींनी अयोध्येला हजेरी लावली. यावेळी जॅकी श्रॉफसुद्धा उपस्थित होते.

जॅकी श्रॉफ यांचं वर्कफ्रंट

जॅकी श्रॉफ अलीकडेच नीना गुप्तांसोबत 'मस्त में रहना का' सिनेमात दिसले. आता जॅकी श्रॉफ लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com