
जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची मोठी कारवाई, सात कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर (Jacqueline Fernandez) मोठी कारवाई केली असून, सुकेश चंद्रशेखर (Sursh Chandrashekhar) प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये 200 कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागड्या भेटवस्तूंचा समावेश असून, जप्त केलेल्या संपत्तीपैकी जॅकलिनच्या 7.12 कोटींच्या फिक्स डिपॉझिटचा समावेश आहे. (Jacqueline Fernandez Assets Attached By ED)
हेही वाचा: शरद पवारांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले....
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी जोडले गेले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय 15 लाख रुपये भावाला दिल्याचेही तपासात समोर आले आहे.
ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यावेळी जॅकलिनने सुकेशने तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि स्वतःला लाखो रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्याचे ईडिला सांगितले होते. याशिवाय सुकेशने जॅकलीनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलल्याचे समोर आले होते. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे.
Web Title: Jacqueline Fernandez Assets Worth 72 Crore Attached By Ed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..