Jacqueline Fernandez : 8 तास चौकशी झाली पण दिल्ली पोलिस समाधानी नाहीत

Jacqueline Fernandez Latest News
Jacqueline Fernandez Latest NewsJacqueline Fernandez Latest News
Updated on

Jacqueline Fernandez News : सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आजची चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनसोबतची आजची चौकशी 8 तास चालली. दरम्यान याप्रकरणी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

आजच्या चौकशीत, दिल्ली पोलिसांनी जॅकलिनसाठी 100 प्रश्न तयार केले होते, जॅकलिनची 200 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली. दरम्यान तिली बहुतेक प्रश्न सुकेश चंद्रशेखर यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याशी संबंधित विचारण्यात आले. आज ती सकाळी 11 वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) कार्यालयात पोहोचली होती. याआधीही तिला दोनदा समन्स बजावण्यात आला होते, मात्र 29 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर या दोन्ही वेळा ती हजर राहीली नव्हती.

आज जॅकलिनच्या चौकशीबाबत स्पेशल सीपी रवींद्र यादव म्हणाले की, चौकशीत काही गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत, त्यासाठी तिला पुन्हा बोलावण्यात येईल. पिंकीलाही पुन्हा बोलावले जाईल. चौकशीत दिलेल्या माहितीवर चर्चेनंतरच कोणताही निष्कर्ष काढता येईल, असे त्यांनी सांगितले. रवींद्र यादव यांनी सांगितले की, यावेळी तीची मकोका प्रकरणात चौकशी करण्यात आली. जॅकलीनने सुकेशकडून भेटवस्तू कशा घेतल्या होत्या, त्यांचा कसा वापर केला गेला, या सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या. ते म्हणाले की, सुकेशला सर्व अभिनेत्रींशी जोडण्यात पिंकी इराणीने मुख्य भूमिका बजावली आहे.

Jacqueline Fernandez Latest News
कॅमेरा पाहून उर्फी लागली पळू; युजर्स म्हणाले, पहिल्यांदा हिचा व्हिडिओ आवडला

परत परत चौकशी होऊ शकते

जॅकलीन आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिच्या वकिलांच्या टीमसोबतॉ आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान तिला सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता, जॅकलिनला सध्या दिल्ली सोडू नका असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी काही दिवस परत चौकशी करता येईल. या प्रकरणात, ईडीने यापूर्वी म्हटले होते की फर्नांडिसचे 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी जबाब नोंदवले गेले होते, ज्यामध्ये त्यांनी सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याची कबुली दिली होती.

नोरा फतेहीचीही चौकशी

या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पिंकी इराणी अभिनेत्रीसोबत होती. इराणी यांनीच फर्नांडिस यांची चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला नोरा फतेहीचीही या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सहा-सात तास चौकशी केली आणि तिची जबाब नोंदवला.

Jacqueline Fernandez Latest News
Diljit Dosanjh : १९८४च्या शीखविरोधी दंगलीवर ‘जोगी’ चित्रपट; दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत

मुख्य आरोपी चंद्रशेखर तुरुंगात

या प्रकरणाचा मुख्य आरोपी चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यात फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांचाही समावेश आहे. ईडीने 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात फर्नांडिसचे नाव चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com