Jacqueline: तब्बल ७ तासानंतर अभिनेत्रीची सुटका, सुकेश प्रकरणात EOW ने केली कसून चौकशी

दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दोनदा चौकशी केलीय. १४ सप्टेंबरनंतर तिला पुन्हा १९ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश होते.
Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.
Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.Google
Updated on

Jacqueline Fernandez: कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिची सोमवारी १९ सप्टेंबर,२०२२ रोजी दिल्ली पोलिसांनी तब्बल ७ तास कसून चौकशी केली. ती दुपारी जवळपास २ च्या सुमारास दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचली. त्यानंतर जवळपास साडे नऊच्या सुमारास जॅकलीन कार्यालयाच्या बाहेर आलेली दिसली. जॅकलिनशी याआधी बुधवारी देखील चौकशी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दोनदा चौकशी केलेली आहे.(Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.)

Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.
Money Laundering Case:'असं कर तू चेन्नईला निघून ये',जॅकलिनला सुकेश असं का म्हणालेला?

सुकेश प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेनं याआधी जॅकलिनला १४ सप्टेंबर रोजी(बुधवारी) चौकशीसाठी बोलावले होते. त्यादिवशी सुकेशची मैत्रिण आणि एजंट पिंकी इराणी देखील चौकशीसाठी हजर राहिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नोरा फतेही,तिचा जिजाजी बॉबी आणि पिंकी इराणी यांची एकत्र चौकशी केली गेली.

Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.
Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.Google

सूत्रांच्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिस हिनं बुधवारी चौकशी दरम्यान स्वतःचा बचाव करत नोरा फतेहीसंदर्भात काही गोष्टी संगितल्या. ज्या गोष्टींना स्पष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी नोरा फतेही आणि अन्य दोन जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,जॅकलिनच्या बेहरिनमध्ये राहणाऱ्या वडीलांना सुकेशने २०२० मध्ये २०१३ चं जुनं मॉडेल असलेली पोर्शे कार आणि आईला जुनी बीएमडब्ल्यू कार,यूएसमधील तिच्या बहिणीला जुनी बीएमडब्ल्यू आणि जॅकलिनला नवीकोरी मिनी कूपर कार दिली होती. माहिती समोर येतेय की,जॅकलिनला सुकेश सोबत लग्न करायचे होते,ही गोष्ट तिनं अक्षय कुमार आणि सलमान खानला देखील सांगितली होती. पण जेव्हा तिला सुकेशच्या काळ्या धंद्यांचा पत्ता लागला तेव्हा तिनं त्याच्यापासून दूर राहणं पसंत केलं होतं.

Jacqueline Fernandez leaves from delhi police EOW office being questioned in the money laundering case.
'नॅशनल क्रश' म्हटल्यावर रश्मिका पहा काय म्हणाली...

सुकेशने नोराच्या जीजूच्या सहाय्यानं तिला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट दिली होती. ज्याची किंमत जवळपास ६५ लाख रुपये इतकी होती. चौकशीत नोरानं सांगितलं की, ती सुकेशला कधीच भेटली नाही. त्यांनी केवळ व्हॉट्सअॅपवर बातचीत केली होती.

पोलिसांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, सुकेश प्रकरणात आता अभिनेत्री निक्की तंबोली,चाहत खन्ना,सोफिया सिंग,अरुषा पाटील यांची देखील चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या अभिनेत्री सुकेशला म्हणे तिहार जेलमध्ये जाऊन भेटल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com