Money Laundering Case:'असं कर तू चेन्नईला निघून ये',जॅकलिनला सुकेश असं का म्हणालेला? jacqueline fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar Money Laundering jacqueline fernandez to submit bank details to delhi police EOW.

Money Laundering Case:'असं कर तू चेन्नईला निघून ये',जॅकलिनला सुकेश असं का म्हणालेला?

Jacqueline Fernandez: दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं(EOW)बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० करोडच्या अफरातफरी प्रकरणात आज १९ सप्टेंबर,२०२२ रोजी जॅकलिनला चौकशीसाठी बोलावलं आहे. मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिनकडे EOW ने सुकेशनं तिला दिलेल्या पैशांची सविस्तर माहिती मागितली होती. तसंच जॅकलिनच्या बॅंक खात्यांचा देखील तपशील मागण्यात आला होता. १९ सप्टेंबर २०२२ रोजी होत असलेल्या चौकशीत हेच सारे तपशील जॅकलीन EOW ला सोपवणार आहे.(Sukesh Chandrashekhar Money Laundering jacqueline fernandez to submit bank details to delhi police EOW.)

हेही वाचा: 'नॅशनल क्रश' म्हटल्यावर रश्मिका पहा काय म्हणाली...

बॅंकेच्या तपशीलांसोबतच EOW ने जॅकलीनला तिनं प्रायव्हेट जेटमधून कधी प्रवास केला होता याचे डिटेल्स आणि तारीखही मागितली होती. जॅकलिन १९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या चौकशीत या सगळ्या प्रश्नांसदर्भातील माहिती EOW ला सांगणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुकेशने जॅकलिनला प्रायव्हेट जेटनं त्याच्याकडे येण्यासाठी पैसे दिले होते,सुकेशने जॅकलिनला म्हटलं होतं की,'माझे एक नातेवाईक निधन पावले आहेत,तेव्हा तू चेन्नईला येशील'. त्यानंतर सुकेशने जॅकलिनला चेन्नईपर्यंत घेऊन येण्यासाठी प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली होती.

हेही वाचा: अमिताभनी मुंबईत पुन्हा खरेदी केलं आलिशान घर, जाणून घ्या प्रॉपर्टीचा सध्याचा आकडा

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या EOW ने जॅकलिन फर्नांडिसची तब्बल ८ तास कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान जॅकलिनकडे महाठग सुकेशने तिला दिलेल्या महागड्या भेटवस्तू संदर्भात चौकशी करण्यात आली होती. तसंच जॅकलिनची भेट सुकेशशी करुन देणाऱ्या पिंकी ईराणीची देखील चौकशी करण्यात आली होती. बोललं जात आहे की या चौकशी दरम्यान जॅकलिननं समाधानपूर्ण उत्तर दिली नाहीत,ती स्वतःचा बचाव करताना दिसून आली. तर काही प्रश्नांची उत्तर देताना ती अडखळताना दिसली.

हेही वाचा: MMS Video वर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने सोडलं मौन;म्हणाली,'मी रडणार नाही,कारण..'

बोललं जातं की मॉडेल पिंकी ईराणी सुकेश चंद्रशेखरची खास मैत्रिण आहे. जॅकलिन फर्नांडिस सारखंच आणखी काही अभिनेत्रींची भेट तिने सुकेशसोबत करून दिली होती. पिंकीच सुकेशने दिलेल्या महागड्या भेटवस्तू जॅकलिनपर्यंत पोहोचवायची. EOW ने केलेल्या चौकशी दरम्यान जॅकलिननं पिंकीवर आरोप करताना म्हटलं आहे की, पिंकीनं आपल्याला सुकेश संदर्भात माहिती दिली होती पण त्याच्या २०० करोडच्या अफरातफरी संदर्भात,त्याच्या इतर काळ्या धंद्यांसदर्भात काहीच आपल्याला सांगितलं नव्हतं.

Web Title: Sukesh Chandrashekhar Money Laundering Jacqueline Fernandez To Submit Bank Details To Delhi Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..