जॅकलिनने विकत घेतलं प्रियांका चोप्राचं जुनं घर; जाणून घ्या किंमत

jacqueline
jacqueline
Updated on

मुंबईत स्वत:चं, हक्काचं घर विकत घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. मुंबईतील जुहू परिसरातील अभिनेत्री प्रियांका चोप्राचं घर जॅकलिनने विकत घेतलंय. गेल्या अनेक वर्षांपासून जॅकलिन वांद्रे परिसरात भाडेतत्त्वावर राहत होती. 

'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, याच घरात प्रियांका चोप्रा राहत होती. २०१८ मध्ये जेव्हा प्रियांकाने निक जोनासशी लग्नगाठ बांधली, तेव्हा ती याच घरात राहत होती. जुहूमधील कर्म योग या इमारतीत हा फ्लॅट असून त्याची किंमत जवळपास सात कोटी रुपये इतकी आहे. या नवीन घरात राहायला येण्यापूर्वी जॅकलिनने तिच्या पसंतीचे इंटेरिअर डेकोरेशन करून घेतलं. या फ्लॅटचं प्रशस्त लिव्हिंग रुम आणि बाल्कनी ही जॅकलिनला सर्वाधिक आवडली. म्हणूनच तिने हा फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला. 

जॅकलिनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती 'मिसेस सीरिअल किलर' या शिरीष कुंदर दिग्दर्शित चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. जॅकलिन लवकरच 'बच्चन पांडे', 'भूत पोलीस' आणि 'सर्कस' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com