२०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीसोबत जॅकलिनचा रोमँटिक फोटो; दोघांचं कनेक्शन उघड | Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez, Sukesh Chandrasekhar

२०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीसोबत जॅकलिनचा रोमँटिक फोटो; दोघांचं कनेक्शन उघड

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत Sukesh Chandrasekhar अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा Jacqueline Fernandez एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून जॅकलिन त्याला डेट करत होती का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, हा फोटो या वर्षी एप्रिल-जून महिन्यातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावेळी चंद्रशेखर जामिनावर बाहेर होता. चंद्रशेखर हा जॅकलिनला चेन्नईमध्ये चार वेळा भेटला आणि या भेटींसाठी त्याने प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केली होती, अशी माहिती ईडीच्या सूत्रांची दिली.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुकेश चंद्रशेखर हा मिरर सेल्फी घेताना जॅकलिनच्या गालावर किस करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या हातात असलेला आयफोन १२ प्रो हा तोच फोन आहे ज्याद्वारे सुकेश चंद्रशेखरने इस्रायली सिमकार्ड वापरून घोटाळा केला होता. सुकेश तुरुंगात असतानाही तोच मोबाईल वापरत होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या महिन्यात ईडीकडून जॅकलिनची तब्बल सात तास चौकशी झाली होती.

“जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती यापुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल", असं जॅकलिनच्या वकिलाने म्हटलं होतं. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात 'मद्रास कॅफे' फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी सुकेशने त्यांच्या पत्नींसोबत मिळून एक डील केली होती. यासाठी सुकेशने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. मलविंदरची पत्नी जापना आणि शिविंदरची पत्नी अदिती यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पतींना कारागृहातून बाहेर काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याची तक्रार त्यांनी केली होती.