
Jacqueline Fernandez : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर सोबत असणारी तिची (Bollywood Actress) ओळख आणि त्याच्याकडून स्विकारलेल्या भेटवस्तु यामुळे जॅकलीनची ईडीनं चौकशी केली आहे. आता तर तिच्यावर आरोपपत्रही दाखल (social media news) झाले आहे. यासगळ्यात जॅकलीनवर संशयित आरोपी असा शिक्काही बसला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (bollywood viral news) जॅकलीननं यापूर्वी ईडीकडे बाहेर देशात जाण्यासाठी दोन ते तीनवेळा अर्जही केला होता. मात्र त्यांनी तो फेटाळून लावत जॅकलीनवर काही अटी आणि निर्बंधही घातले होते. आता जॅकलीनं ईडीच्या जाळ्यात अडकल्याचे सांगितले जात आहे.
सध्याच्या परिस्थितीवर जॅकलीनच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमध्ये होता तेव्हा त्याच्या भेटीला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी अभिनेत्री गेल्या होत्या. त्यात जॅकलीनचं नावंही समोर आलं होतं. जॅकलीन आणि सुकेशची एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानं जॅकलीनला काही महागड्या वस्तु भेट म्हणून दिल्या होत्या. केवळ जॅकलीनलाच नाहीतर तिच्या कुटूंबियांना देखील त्यानं काही भेटवस्तु पाठवल्या होत्या. सुकेशवर 215 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून सध्या तो तुरुंगात आहे. ईडीकडून त्याची चौकशीही सुरु आहे.
जॅकलीनचे वकिल प्रशांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, ईडीनं जॅकलीनवर आरोपपत्र दाखल करत तिला आरोपी केले आहे. जॅकलीनला पहिल्यांदाच कुठल्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी तिची ईडीनं तिला चौकशीसाठी बोलावले होते. आम्हाला अद्याप चार्जशीटची अधिकृत कॉपी मिळालेली नाही. आम्हाला फक्त तिच्यावर आरोपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ईडीशी कोणतेही बोलणे झालेले नाही.
जॅकलीनला देखील आरोपपत्राची कॉपी मिळालेली नाही. मीडियामध्ये जी चर्चा आहे ती जर खरी आहे असे मानले तर मग तसं होणं दुर्देवी आहे. जॅकलीनला आरोपीच्या रुपात सादर करण्यात आले आहे. अभिनेत्री तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तिची प्रतिमा जपण्यासाठी आवश्यक ती पावलं कायद्याच्या आधारे उचलणार आहे. आतापर्यत जॅकलीननं ईडीला सहकार्य केल्याचेही पाटील इ टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.