Money Laundering Case : जॅकलीन फर्नांडिसला समन्स; २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jacqueline fernandez Latest News

जॅकलीन फर्नांडिसला समन्स; २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

jacqueline fernandez Latest News दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने २०० कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) समन्स बजावले आहे. समन्समध्ये (Summons) जॅकलीनला २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

या प्रकरणाचा संबंध महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनला या प्रकरणी आरोपी केले आहे. जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी ईडीला एफडी स्वतःच्या पैशातून तयार केल्याचे सांगितले होते. बुधवारी पटियाला हाउस कोर्टाने या प्रकरणात अलीकडेच दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली.

हेही वाचा: Alia Bhatt : आलियाचे प्रेग्नेंसी लूक खूपच स्टायलिश

जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पुढील महिन्यात २६ तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी आणि मनी लाँड्रिंग केल्याचा समावेश आहे. दोघांची छायाचित्रे समोर आल्यानंतर अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा पसरली होती.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

याप्रकरणी जॅकलीनची एजन्सीने अनेकवेळा चौकशी केली आहे. शेवटची चौकशी जूनमध्ये झाली होती. ईडीने एप्रिलमध्ये पीएमएलए अंतर्गत अभिनेत्रीची ७.२७ कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू आदींचा समावेश आहे.

Web Title: Jacqueline Fernandez Summons Delhi Court Money Laundering Case September 26

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..