esakal | 200 कोटी घोटाळा प्रकरण : जॅकलीन होणार 'माफीची साक्षीदार'
sakal

बोलून बातमी शोधा

200 कोटी घोटाळा प्रकरण : जॅकलीन होणार 'माफीची साक्षीदार'

200 कोटी घोटाळा प्रकरण : जॅकलीन होणार 'माफीची साक्षीदार'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ईडीनं आता मोठमोठ्या सेलिब्रेटींच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. यात अडकलेल्या सेलिब्रेटींची नावं सध्या चर्चेत आली आहे. ही कारवाई कुठल्या राजकीय व्देषापोटी करण्यात आली आहे की, खरचं त्या सेलिब्रेटींचं काही कनेक्शन आहे याचा शोध सुरु आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन Jacqueline Fernandez ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण दोनशे कोटींच्या घोटाळ्यात तिचं नावं आलं आहे. त्यामुळे ती या प्रकरणात दोषी आहे किंवा नाही याबद्दल वेगवेगळ्या प्रकरणं पुढं येताना दिसताहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तिच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

जेव्हा जॅकलीनची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आता सुत्रांकडून अशी माहिती समोर आली आहे की, जॅकलीनला एक माफीचा साक्षीदार म्हणून विचारपूस करण्यात आली आहे. ईडीच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणात आणखी एक गोष्ट पुढे आली आहे. ती म्हणजे बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचं नावही याप्रकरणात समोर आले आहे. मात्र त्या अभिनेत्याचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या तपासात एजन्सीनं एका बंगल्यावर छापेमारी केली होती. त्यातून त्यांना ८२ लाख रुपये मिळाले होते. याशिवाय १२ पेक्षा अधिक लक्झरी कारही त्यांनी जप्त केल्या होत्या.

हेही वाचा: शहनाजचं आतापर्यतचं सर्वात 'बोल्ड' फोटो शूट

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलीनचं नाव मनी लॉड्रींग केसमध्ये घेण्यात आलं होत. याप्रकरणी तिची चौकशीही करण्यात आली आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे. २३ ऑगस्टला तिहार जेलमधून पैशांची वसूली करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री लीना पॉल यांच्या चैन्नईतील बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. ईडीनं हा छापा टाकला होता. त्या छाप्यातून करोडो रुपये जप्त करण्यात आले होते. याशिवाय १५ गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुकेशनं एका बड्या उद्योगपतीची पत्नीकडून दोनशे कोटींची वसूली केली होती. यावेळी लीना पॉलचीही चौकशी करण्यात आली आहे.

loading image
go to top