'जैसा बाप,वैसी बेटी';कपिलच्या 'ड्रमर' मुलीवर चाहते फिदा

कॉमेडी किंगची मुलगी अनायराचेही लाखो चाहते;ड्रम वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Kapil Sharma with daughter Anayra Sharma
Kapil Sharma with daughter Anayra SharmaGoogle

पंजाबच्या एका छोट्याशा गावातनं आलेल्या कपिलनं (Kapil Sharma) आपल्या विनोदी अभिनयगुणाच्या कौशल्यावर एंटरटेनमेन्ट इंडस्ट्रीत आपलं चांगलं नाव कमावलं. स्टॅंड अप कॉमेडियन पासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता बॉलीवूडपर्यंत जाऊन पोहोचलाय. इतकच नाही तर त्याचा स्वतःचा एक शो आहे 'द कपिल शर्मा शो' जो छोट्या पडद्यावरचा सगळ्यात प्रसिद्ध शो आहे. सलमान खान सारखा मोठा अभिनेता या शो चा निर्माता आहे. या शो मध्ये अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली आहे. आणि हसता-हसता कपिलने या सर्वांचीच दांडी गुल केली आहे. पण कपिलच्या विनोदी बॅंटिगपुढे ते सारेच क्लीन बोल्ड झाले. कपिल सोशल मीडियावर जितका अॅक्टिव्ह असतो तितकाच तेथील एखाद्या पोस्टमुळे किंवा ट्वीटमुळे तो वादातही ओढला जातो. पण काही दिवसांपूर्वी त्यानं आपल्या मुलीचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. जो चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा त्या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

कपिल शर्मा हा आता दोन मुलांचा बाप बनलाय. मोठी मुलगी आणि छोटा मुलगा अशी दोन अपत्य त्याला आहेत. त्याची मोठी मुलगी अनायरा ही तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. तिचं गोंडस दिसणं कपिलच्या चाहत्यांना अधिक भावलं पण आता ती जसजशी मोठी होतेय तसे तिच्या अंगातल्या काही उपजत कलेचेही अनेकजण फॅन्स झाले आहेत. दोन वर्षाच्या छोट्या अनायराने इतक्या सफाईदारपणे स्टायलिश ड्रमरच्या हावभावात ड्रम हे इन्स्ट्रुमेंट वाजवलंय की कपिलच्या चाहत्यांनी त्या व्हिडीओवर कमेंट केलीय,'जैसा बाप ,वैसी बेटी'. अनायरा ड्रम वाजवायचा आनंद स्वतः लुटतेच आहे पण समोर उभ्या असलेल्या आपल्या वडिलांनाही ड्रमच्या स्टिक्स हातात धरायला सांगून ड्रम वाजवण्यास उत्स्फुर्तपणे सांगत आहे. हा व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com