जान्हवी नंतर आता खुशीची बॉलीवूडमध्ये एंट्री |Khushi Kapoor news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khushi Kapoor

शाहरुख खानच्या मुलीसोबत आता खुशी देखील दिसणार.

जान्हवी नंतर आता खुशीची बॉलीवूडमध्ये एंट्री

जान्हवी कपूरनंतर, बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची खूप प्रतिक्षा होती. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत तिने एका चित्रपटात काम केल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती, जेव्हापासून ते डान्स रिहर्सलसाठी एकत्र दिसले होते. त्यानंतर, माहितीनुसार खुशी, अगस्त्य आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोबत झोया अख्तरच्या चित्रपटात पदार्पण करतील. (Janhvi Kapoor's sister Khushi Kapoor to start shooting for her debut film in April)

यापैकी एकाकडूनही खात्री झालेली नसली तरी, बोनी कपूरने खुशीच्या (Khushi Kapoor) डेब्यू चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या. अलीकडेच, एका मुलाखतीत बोलताना बोनी म्हणाले, "ती एप्रिलमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. तुम्हाला अधिक सांगू शकत नाही, तुम्हाला लवकरच याबद्दल अधिक माहिती मिळेल."

जान्हवीप्रमाणेच (Janhavi Kapoor) खुशीलाही अभिनयात करिअर करायचे आहे, असे बोनी यांनी यापूर्वी सांगितले होते. या स्टार किडची सोशल मीडियावर आधीच चांगली चर्चा आहे.

जानेवारी 2021 मध्ये, बोनीने (Boney Kapoor) सांगितले होते की तो तिला लॉन्च करणार नाही. त्याने बॉम्बे टाईम्सला सांगितले होते, “माझ्याकडे संसाधने आहेत, पण मला तिला दुसऱ्या कोणीतरी लाँच केलेले आवडेल कारण मी तिचा बाप आहे आणि एक तर आनंदी असतो. त्यामुळे चित्रपट निर्माता म्हणून तुम्हाला ते परवडत नाही आणि ते अभिनेत्यांसाठीही चांगले नाही.”

Web Title: Janhvi Kapoors Sister Khushi Kapoor To Start Shooting For Her Debut Film In April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top