Jasik Ali Arrested : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक

संबंधित अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याच्या अमिषानं दिग्दर्शकानं तिचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Malayalam director Jasik Ali arrested
Malayalam director Jasik Ali arrested esakal

Malayalam director Jasik Ali arrested : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जसिक अली बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची बातमी चाहत्यांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

संबंधित अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याच्या अमिषानं दिग्दर्शकानं तिचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर दिग्दर्शक जसिक हा काही दिवस फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सध्या त्याला पोस्को कायद्यानुसार न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

३६ वर्षीय जसिक अलीवर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर तमिळ चित्रपट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पीडितेला चित्रपटात महत्वाची भूमिका देण्याचे अमिष त्यानं दाखवले होते. जसिक हा मुळचा कुरुंगवाडचा असून त्याला कोझिकडेमधून अटक करण्यात आली आहे. कोयिलेंडे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसिकनं पीडितेला चित्रपटात काम देण्याचे अमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सध्या जसिकला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com