Jau Bai Gavat: शहरातल्या मुलीने जिंकलं गावचं मैदान, रशमा फारुकी ठरली ‘जाऊ बाई गावात’ ची विजेती, मिळाली ट्रॉफी आणि लाखोंचं बक्षीस

Jau Bai Gavat: रशमा फारुकीनं (Ramsha farooqui) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Jau Bai Gavat
Jau Bai Gavat
Updated on

Jau Bai Gavat: छोट्या पडद्यावरील ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavat) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या शोमध्ये शहरातील काही मुलींनी गावात जाऊन विविध टास्क केले. हे टास्क करताना या मुलींना विविध अडचणींचा सामना करावा लागला. काल (11 फेब्रुवारी) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. रशमा फारुकीनं (Ramsha farooqui) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी रशमावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

काल (11 फेब्रुवारी) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याला महेश मांजरेकर आणि आदेश बांदेकर यांनी हजेरी लावली. महेश मांजरेकर यांनी ) ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या विजेतीच्या नावाची घोषणा केली. रशमा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची विनर ठरली. रशमाला 20 लाखांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली.

Jau Bai Gavat
Hardeek Joshi: "ती खंत कायम मनात राहील", हार्दीक जोशीने सांगितला भावूक करणारा किस्सा

‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनची विजेती रशमा फारुकीवर आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रशमानं सोशल मीडियावर ग्रँड फिनालेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन रशमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

रशमानं जाऊ बाई गावात या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, "तुमच्या सर्वांची लाडकी रमशा आज तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बनली आहे गावची लाडकी लेक"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com