Javed Akhtar : 'आजकालच्या नव्या कलाकारांना तर...' , जावेद अख्तर यांचा नवोदित अभिनेत्यांवर हल्लाबोल!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथाकार आणि गीतकार अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांची परखड वक्ते म्हणूनही चर्चा होत असते.
Javed Akhtar Bollywood celebrity's comment
Javed Akhtar Bollywood celebrity's comment esakal

Javed Akhtar Bollywood celebrity's comment : बॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथाकार आणि गीतकार अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांची परखड वक्ते म्हणूनही चर्चा होत असते. ते आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी एका मुलाखतीमध्ये नवोदित कलाकार आणि त्यांच्या काम करण्याचा अंदाज यावर हल्लाबोल केला आहे.

काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलवर सडकून टीका केली होती. अॅनिमल आणि कबीर सिंह सारखे चित्रपट जेव्हा यशस्वी होतात तेव्हा काळजी वाटू लागते. अॅनिमलमध्ये महिलांचे ज्या प्रकारे चित्रिकरण केले गेले त्यावरुन काहीच बोलायचे नाही का, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी केला होता. आताही ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट खलनायक मधील चोली के पिछे क्या है, गाण्यावरही जावेद अख्तर यांनी टीका केली होती. याशिवाय मणिरत्नम यांच्यावरही जावेद अख्तर यांनी तोफ डागली होती. आता त्यांनी बॉलीवूडमध्ये जे नवोदित कलाकार येतात त्यांच्या भाषेविषयी कमेंट केली आहे. त्यांचे वाचन आणि त्यांचा अभिनय यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.

जावेद अख्तर काय म्हणाले?

आजकालचे जे नवोदित कलाकार आहेत त्यांना हिंदी डायलॉग काही वाचता येत नाही. त्यांना इंग्रजीमध्ये स्क्रिप्ट हवी असते. त्याशिवाय त्यांना काही कळतच नाही. ही गंभीर गोष्ट आहे. सी डी देशमुख ऑडीटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील हिंदी अँड उर्दू सियामीज़ ट्विन्स वरील परिसंवादात त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Javed Akhtar Bollywood celebrity's comment
Javed Akhtar on Animal: "हे खुपच धोकादायक!" जावेद अख्तर रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'वर का भडकले?

आता आम्ही सगळं काही इंग्रजीतच लिहितो. त्याचे स्क्रिप्ट नवोदित कलाकारांना वाचता येतं. हिंदी काही असेल तर त्यांना कळत नाही. ही शोकांतिका आहे. भाषेची तर खूपच दयनीय स्थिती आहे. कुठलीही भाषा आणि धर्माचे काही देणे घेणे नाही. आपण त्याकडे खूपच वेगळ्या दृष्टीनं पाहतो आहोत. असे अख्तर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com