Birthday Special : जावेद अख्तर यांची 'ती' प्रसिद्ध शायरी एकदा वाचायलाच हवी

Javed akhtar famous shayari on his birthday
Javed akhtar famous shayari on his birthday

मुंबई : सुप्रसिद्ध शायर आणि बॉलिवूडचे कथालेखक जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. जावेद यांचा आज 75 वा वाढदिवस असून त्यांनी जवळचे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. जावेद यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये 17 जानेवारी 1945 ला झाला. जावेद हे कविता आणि गीतकार अशा वातावरणातच मोठे झाले. त्यांनी शायरी, स्क्रिनप्ले आणि गाणी यांचे लेखन केले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट गाण्यांचं लिरिक्स हे जावेद यांनी लिहिले आहे. त्यांच्या शायरीचे लाखो दिवाने आहेत. केवळ लिखाण नाही जावेद हे देशातील अनेक विषयांवर खुलेपणाने मत मांडतात. वाचा त्यांची प्रसिद्ध शायरी आणि काही सुपरहिट गाणी. 

जावेद यांच्या अप्रतिम लेखणीमुळे त्यांना 1999 मध्ये 'पद्म श्री' तर, 2007 मध्ये 'पद्म भूषण' ने सन्मानित करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटासाठी जावेद यांनी स्क्रिनप्ले लिहिला आणि तिथुनच त्यांच्या करीअरला सुरुवात झाली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख त्यांना मिळाले. स्क्रिनप्लेचं लिखाण त्यांनी सलीम खान यांच्यासोबत केलं. ही जोडी पुढे इतकी लोकप्रिय झाली की, बॉलिवूडमधील 21 चित्रपटांच्या स्क्रिनप्लेचं लिखाण या जोडीने केले. सलीम-जावेद ही जोडी बॉलिवू़डमध्ये चांगलीच फेमस झाली. अंदाज, झंझीर, शोले, दिवार अशा सुपरहिट सिनेमांसाठी स्क्रिनप्लेचं लिखाण या जोडीने केले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

75 years of ‘Jadoo’ .. love you pa. Happy birthday.

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

याशिवाय जावेद यांनी मे और मेरी तन्हाई (सिलसिला), पंछी नदिया (रिफव्हुजी), दर्द-ए-डिस्को (ओम शांती ओम), जश्न-ए-बहार (जोधा अकबर) यांचे गीतकार जावेद हे आहेत. जावेद यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि उर्दुमधील साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला आहे. जावेद यांचा मुलगा फरहान अख्तर याने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्य़ा शुभेच्छा देणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो जावेद यांच्या नातींसोबत आहे म्हणजेच फरहानच्या दोन्ही लेकींसोबतचा हा गोड फोटो आहे.

जावेद यांची एक प्रसिद्ध शायरी...
ख़ून से सींची है मैं ने जो ज़मीं मर मर के 
वो ज़मीं एक सितम-गर ने कहा उस की है 
इन चराग़ों में तेल ही कम था 
क्यूँ गिला फिर हमें हवा से रहे 
मुझे दुश्मन से भी ख़ुद्दारी की उम्मीद रहती है 
किसी का भी हो सर क़दमों में सर अच्छा नहीं
ऊँची इमारतों से मकाँ मेरा घिर गया 
कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए 
ग़लत बातों को ख़ामोशी से सुनना हामी भर लेना 
बहुत हैं फ़ाएदे इस में मगर अच्छा नहीं लगता 
इस शहर में जीने के अंदाज़ निराले हैं 
होंटों पे लतीफ़े हैं आवाज़ में छाले हैं 
धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है 
न पूरे शहर पर छाए तो कहना 
तब हम दोनों वक़्त चुरा कर लाते थे 
अब मिलते हैं जब भी फ़ुर्सत होती है 
अक़्ल ये कहती है दुनिया मिलती है बाज़ार में 
दिल मगर ये कहता है कुछ और बेहतर देखिए 
टिप्पणियां
उस की आँखों में भी काजल फैल रहा है 
मैं भी मुड़ के जाते जाते देख रहा हूँ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com