Javed Akhtar: 'जणू मी तिसरं महायूद्धचं जिंकलं..', पाकिस्तानबद्दलच्या त्या वक्तव्यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

Javed Akhtar
Javed Akhtaresakal

जेव्हापासून गीतकार आणि लेखक जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये जेव्हा जावेद अख्तर २६/११ च्या मुंबई हल्ल्यावर वक्तव्य केले. तेव्हापासून हे प्रकरण सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी तिथं 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण सांगितली आणि म्हटलं की दहशतवाद त्यांच्याच देशात आहे. यासंबधीच्या वक्यव्यावर लोक टाळ्या वाजवत होते.

मात्र त्यानंतर पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य लोक याचा निषेध करत आहेत. तर भारतात जावेद अख्तर यांना पार डोक्यावर घेतलं गेलं. आता या प्रकरणावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

Javed Akhtar
Javed Akhtar News: "ही खरी ५६ इंचाची छाती, भाजप नेत्यांनी जावेद अख्तरांचे अभिनंदन करावे"

एका कार्यक्रमात जावेद साहेब म्हणाले की, भारतात परतल्यावर मला तिसरे महायुद्ध जिंकल्यासारखे वाटले. मीडियातून इतक्या प्रतिक्रिया आल्या की मला माझा फोन बंद करावा लागला. मी विचार केला मी कोणता तीर मारला? मला या गोष्टी सांगायच्या होत्या. आपण गप्प बसावे का? नाही.

Javed Akhtar
Urfi Javed New Look: 'तुला पाहून चेटकिणीलाही अटॅक यायचा',उर्फीचा नवा लुक व्हायरल..नेटकरीही घाबरले

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, माझ्या वक्तव्याने पाकिस्तानात दहशत निर्माण झाली आहे, हे मला आता कळत आहे. जरी आता तिथले लोक मला शिव्या देत आहेत. लोकांना प्रश्न पडतो की मला व्हिसा का दिला गेला?

जावेद अख्तर म्हणाले की, हा देश कोणत्या प्रकारचा आहे हे मला आठवं. मी जिथं जन्मलो तिथे मी वादग्रस्त विधान करुन आलो आहे. मी इथेच मरेन. जेव्हा मी इथे भीतीने राहत नाही, तर मग मी तिथल्या गोष्टींना का घाबरू?

Javed Akhtar
आमच्याच घरात येऊन आमचीच इज्जत.. Javed Akhtar यांच्या 'त्या' विधानावर पाकिस्तानी सेलिब्रिटी खवळले

शुक्रवारी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात आयोजित फैज महोत्सवात हजेरी लावत मुंबई हल्ल्याचा निषेध केला आणि ज्यांनी हा हल्ला केला ते आजही तुमच्या देशात फिरत आहेत, त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे, असं म्हटलं होतं. जावेद अख्तर म्हणाले की, आपला देश ज्या प्रकारे पाकिस्तानातील कलाकारांचे स्वागत करतो, त्याच पद्धतीने भारतीय कलाकारांचे पाकिस्तानात स्वागत होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com