
रिलीज आधीच शाहरुखचा 'जवान' जाऊन बसला करोडोच्या क्लबमध्ये, वाचा सविस्तर
बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या(Shahrukh Khan) नावाचा २०२३ मध्ये चांगलाच बोलबाला होणार आहे. यावर्षी त्याचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीच्या 'जवान'(Jawan) मध्ये किंग खानचा जबरदस्त अवतार पहायला मिळणार आहे. याआधी आपण शाहरुखला कधीच असं पाहिलं नसेल. सिनेमाच्या टिझर रिलीजनंतर सगळीकडे 'जवान'चा धमाका सुरू आहे,सिनेमा प्रदर्शित झाल्यावर या धमाक्याचा आवाज आणखी वाढेल एवढं निश्चित.(Jawan: Shah Rukh Khan starrer's OTT streaming rights sold to Netflix for this Big Price)
हेही वाचा: शेखर सुमनच्या मुलाला भोंदू बाबानं लुबाडलं; लाखो रुपयांचा लावला गंडा
'जवान' च्या ओटीटी राइ्टसमुळे देखील सिनेमाचं वजन वाढलं आहे. नेटफ्लिक्सनं मोठ्या किमतीला ते राइट्स विकत घेतल्याचं बोललं जात आहे. मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार,'जवान'च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्सला सिनेमाचे डिजिटल राइट्स विकले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का हे स्ट्रीमिंग राइट्स किती करोडला विकले गेले आहेत? कळतंय की निर्मात्यांनी नेटफ्लिक्सला जवानचे राइट्स तब्बल १२० करोडला विकले आहेत.
हेही वाचा: स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी, काय लिहिलंय निनावी पत्रात?
एवढं तर नक्कीच मान्य करावं लागेल की शाहरुखच्या 'जवान'चा रिलीज आधीच डंका वाजला आहे. सिनेमागृहात जवान २ जून,२०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी,तामिळ,तेलुगू,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 'जवान' मध्ये प्रथमच शाहरुख खान आणि नयनतारा मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा: ऑस्कर समितीवर काजोलची निवड,पती अजय देवगणच्या पोस्टनं वेधलं लक्ष
'जवान' च्या प्रदर्शनाआधी शाहरुख 'पठाण' सिनेमातून सिल्व्हर स्क्रीनवर बऱ्याच वर्षांनी पदार्पण करत आहे. पठाण सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाची सुद्धा बरीच चर्चा होत आहे. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत.
Web Title: Jawan Shah Rukh Khan Starrers Ott Streaming Rights Sold To Netflix For This Big
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..