esakal | जय भानुशालीला पत्नीने इन्स्टाग्रामवर केलं ब्लॉक
sakal

बोलून बातमी शोधा

Jay Bhanushalis wife Mahhi Vij

जय भानुशालीला पत्नीने इन्स्टाग्रामवर केलं ब्लॉक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली Jay Bhanushali याला त्याची पत्नी माही विजने Mahhi Vij इन्स्टाग्राम Instagram या फोटो शेअरिंग अॅपवर ब्लॉक केलं आहे. खुद्द जयनेची चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. माहीने अनब्लॉक करावं यासाठी तिला विनंती करा, असंही त्याने चाहत्यांना सांगितलं. मंगळवारी जयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी तारा आणि पत्नी माहीसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. यानंतरच माहीने त्याला ब्लॉक केलं. इन्स्टा स्टोरीमध्ये व्हिडीओ पोस्ट करत जयने याबद्दलची माहिती दिली.

व्हिडीओमध्ये जेव्हा जयने माहीला ब्लॉक करण्यामागचं कारण विचारलं, तेव्हा ती म्हणाली, "तू नेहमीच माझे वाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतोस. यापुढे असं करू नकोस." यावर माहीला समजावण्यासाठी तो तिला सांगतो की फोटोवर नेटकऱ्यांनी फक्त चांगले कमेंट्स केले आहेत. कोणीही तिच्या फोटोला वाईट म्हटलेलं नाही. "हेच मी केलं असतं तर आतापर्यंत तू मला खूप काही सुनावलं असतं. आता तू माझ्यावर आधीसारखं प्रेम करत नाहीस. तुझं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे, असे आरोप माझ्यावर झाले असते", असं जय तिला म्हणतो. अनब्लॉक करण्यासाठी चाहत्यांनी माहीला मेसेज करून विनंती करावी, असंही तो या व्हिडीओत म्हणतो. जयच्या विनंतीनंतर काहींनी माहीला मेसेजसुद्धा केले. मात्र तरीही तिने त्याला अनब्लॉक केलं नसल्याचं जयने नंतर स्पष्ट केलं.

हेही वाचा: भारती सिंगने १५ किलो वजन केलं कमी; सांगितला खास डाएट प्लान

जय आणि माहीने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना तारा ही मुलगी आहे. याशिवाय त्यांनी खुशी आणि राजवीर या दोन मुलांना दत्तक घेतलं आहे.

loading image
go to top