Jaya Bachchan : 'मूर्ख आहेत 'त्या' मुली ज्या डेटवर जाऊन...' नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन काय बोलून गेल्या?

नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan latest news) यांनी आजच्या मुलींवर केलेली टिप्पणी ही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
Jaya Bachchan Navya Naveli Podcast
Jaya Bachchan Navya Naveli Podcast esakal

Jaya Bachchan News : बॉलीवूडमध्ये आपल्या वक्तव्यानं नेहमीच नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये जया बच्चन यांचे नाव सगळ्यात पहिल्यांदा घेतले जाते. त्या त्यांच्या परखड वक्तव्यासाठी (Jaya Bachchan Viral News) ओळखल्या जातात. आता त्यांनी त्यांच्या नातीच्या नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

राज्यसभा असो किंवा कुण्या एखाद्या सेलिब्रेटीच्या घरातील पार्टी जया (Jaya Bachchan Latest News) बच्चन तिथं हजर असल्यास काही ना काही वाद होणार हे आतापर्यंतच्या त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून आले आहे. आता जया बच्चन यांनी नव्या नवेलीच्या पॉडकास्टमध्ये आजकालच्या मुली, त्यांचे डेटिंग आणि त्यांचे वागणे यावर केलेली टिप्पणी लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

जया बच्चन यांनी त्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, त्या मुली मूर्ख (Navya Naveli Nanda Podcast) असतात ज्या डेटवर जाऊन अर्ध बिल भरतात. तुम्ही जर एखाद्या मुलासोबत डेटवर गेला आहात तर त्या मुलालाच बिल भरु द्या, सगळ्यात पहिल्यांदा प्रपोजही मुलांनाच करु द्या. त्यांना पुढाकार घेऊ द्या. असं मत जयाजी यांनी त्यांच्या पॉडकास्टमधून मांडले आहे. ज्याची चर्चा होत आहे.

जयाजी या अशा सेलिब्रेटींमध्ये येतात ज्या नेहमीच त्यांच्याच परखडपणासाठी ओळखल्या गेल्या आहेत. त्यासाठी त्यांना बऱ्याचदा ट्रोलही केले जाते मात्र जयाजी त्यांना ट्रोल करणाऱ्यांना देखील जशास तसे सुनावण्यास मागे पुढे पाहत नाहीत हे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे. काही दिवसांपासून त्यांच्या नातीच्या नव्या नवेलीच्या पॉडकास्टविषयी बोललं जात आहे.

Jaya Bachchan Navya Naveli Podcast
Hemangi Kavi : समोरुन 'जय महाराष्ट्र' ऐकू आलं अन् उर भरुन आला! हेमांगीची भावूक पोस्ट, ‘Best Maa’ चा मिळाला पुरस्कार

त्या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनमध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा या सहभागी झाल्या होत्या. यावेळी नव्यानं फेमिनिझवरुन जयाजी यांना काही प्रश्न विचारले होते. तेव्हा जयाजी म्हणाल्या, ज्या मुली डेटवर जाऊन स्वत: अर्ध बिल भरतात त्या मूर्ख आहेत. आपण ज्या मुलासोबत डेटवर गेलो आहोत त्यालाच बिल भरु द्यावे.

व्हाट द हेल नव्या २ नावाच्या नव्याच्या पॉडकास्टची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. यापूर्वी देखील जया बच्चन यांनी त्या पॉडकास्टमधून वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केल्याचे दिसून आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com