सलमान-संजय दत्तवेळी दयाळु होता मिडिया, रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ बॉलीवूडचं खुलं पत्र

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

सोनम कपूर, शिबानी दांडेकर, जोया अख्तर, गौरी शिंदे आणि अनुराग कश्यप सोबतंच २५०० लोकांनी आणि जवळपास ६० संस्थांनी न्यूज मिडियाच्या नावावर एक खुलं पत्र लिहिलं आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या बाबतीत झालेल्या मिडिया ट्रायलमुळे बॉलीवूडचा एका ग्रुप उभा राहिला आहे. सोनम कपूर, शिबानी दांडेकर, जोया अख्तर, गौरी शिंदे आणि अनुराग कश्यप सोबतंच २५०० लोकांनी आणि जवळपास ६० संस्थांनी न्यूज मिडियाच्या नावावर एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये म्हटलंय, 'बातम्या शोधा, महिला नाही.'

हे ही वाचा : रिद्धिमा कपूरच्या बर्थडेनिमित्त नीतू कपूर आणि आलियाने केला धमाकेदार डान्स

या पत्रामध्ये म्हटलंय, 'जेव्हा आम्ही रिया चक्रवर्तीला मिडियाची शिकार होताना पाहतो तेव्हा आम्हाला समजत नाही की पत्रकारितेची नैतिकता यांनी सोडली आहे का? तुम्ही एका महिलेची मानवी प्रतिष्ठा आणि मोठेपणा टिकवून ठेवण्याऐवजी कॅमेरा घेऊन तिच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात. तुम्ही तिच्या गोपनियतेचं उल्लंघन करत आहात आणि खोट्या आरोपांवर दिवस-रात्र काम करत आहेत. 'रियाला अडकवा' असं नाटक सुरु आहे.'

पत्रात सांगितलं गेलं आहे की मिडियाने संजय दत्त आणि सलमान खान दोघांना क्लिन चीट दिली होती. पत्रामध्ये पुढे लिहिलं आहे की, 'आम्हाला माहित आहे तुम्ही वेगळे असू शकता. कारण आम्ही तुम्हाला सलमान आणि संजय दत्तप्रती दयाळु आणि योग्य आदराने वागताना पाहिलं आहे. मात्र जेव्हा एका युवा .महिलेची गोष्ट येते जिच्यावर अजुन कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही तरीही तिच्या चारित्र्याची हत्या केली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला पाडण्यासाठी ऑनलाईन लोकांना उकसवलं गेलं आहे. चुकीच्या मागण्यांचा जोर धरला आणि त्याला स्वतःचं जिंकणं म्हटलं गेलं. कोण आहे या जिंकण्यामध्ये?'

'तुम्हाला केवळ एक कहाणी तयार करण्याचं वेड लागलं आहे. एक युवा महिला जी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते.  लग्नाशिवाय तिच्या प्रियकरासोबत राहू शकते, अभिनय करण्याऐवजी स्वतःसाठी बोलतेय. नैतिकदृष्ट्या संशयास्पद पात्र आहे, तिला कोणत्याही किंमतीवर तपासाशिवाय, कायद्याच्या प्रक्रियेविना आणि तिच्या हक्कांच्या सन्मानासाठी एक आरोपी मानलं जात आहे.'

पत्रात म्हटलंय, 'आधीपासूनंच महिलांवर लोकांचा अविश्वास आहे. त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी शिव्या घातल्या जातात. एका महिलेला आरोपीच्या पिंज-यात उभं करणं फार सोपं आहे. मिडियाला महारोगराईच्या या संकटात मानसिक स्वास्थ्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण यामुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे.'  

many celebs signed in an open letter against the witch hunt rhea chakraborty  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many celebs signed in an open letter against the witch hunt rhea chakraborty