Jaya Bachchan : 'तुम्ही सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह का नसता', जया बच्चन यांनी काय दिलं उत्तर?

प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहेत.
Jaya Bachchan News
Jaya Bachchan Newsesakal

Jaya Bachchan Navya Naveli Podcast : बिग बी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्याविषयी चर्चेत असतात. बिग बी अमिताभ हे वयाची ८० वर्षे ओलांडली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात जया बच्चन यांना देखील त्या पॉडकास्टमध्ये तो प्रश्न विचारण्यात आला होता.

जया बच्चन या त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या व्हाट द हेल नावाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या नेहमीच शैलीत वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं होती. त्यात आता त्यांना नव्यानं जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह का नसता असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय असणारं नाव म्हणजे जया बच्चन. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमधून आपल्या नावाची ठळक ओळख निर्माण केली. जयाची या जशा त्यांच्या कलात्मक अभिनयासाठी ओळखल्या जातात तशाच आक्रमक स्वभावासाठीही परिचित आहेत. खासकरुन बॉलीवूडमधील पापाराझ्झी हे जया बच्चन यांना घाबरुन असतात.

जयाजी यांनी आपण सोशल मीडियापासून जास्त लांब का असतो हे सांगितले आहे. जया बच्चन यांचे म्हणणे आहे की, खरं सांगायचं तर आमच्याविषयी जगभरातील लोकांना खूप काही माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, मला त्यांच्यासोबत आणखी काही शेयर करावं. त्यांना फार काही सांगण्यासारखे आहे किंवा त्याची गरज आहे असेही मला वाटत नाही.

Jaya Bachchan News
Aamir Khan : 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' चाहत्याच्या प्रश्नावर आमिरनं दिलं उत्तर!

वयाच्या१५ व्या वर्षी जयाजी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेल्या महानगर नावाच्या चित्रपटापासून सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती गुड्डी नावाच्या हिंदी चित्रपटापासून. जयाजींचा गेल्या वर्षी करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com