Jaya Prada: 'त्या' सीनच्या वेळी झाली चूक, अभिनेत्याच्या कानफटात दिली ठेवून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaya Prada

Jaya Prada: 'त्या' सीनच्या वेळी झाली चूक, अभिनेत्याच्या कानफटात दिली ठेवून

Jaya Prada bollywood actress: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटींविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी या नेहमीच सोशल मीडियावरुन व्हायरल होत असतात. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळतो. आपल्या आवडत्या कलाकारांविषयीच्या त्या पोस्ट वाचायला, पाहायला चाहत्यांनाही आवडते. अशीच एक बातमी आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा आणि अभिनेता दिलीप ताहिल यांच्यातील एका वादाची बातमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जया प्रदा आणि दिलीप ताहिल एका चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले होते. त्या चित्रपटामध्ये जया प्रदा आणि दिलीप ताहिल यांच्यातील रेप सीन शुट होत असताना जे घडलं त्यामुळे मोठा वादात सापडले होते. जया प्रदा यांनी त्या सीनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यातच दिलीप ताहिल यांनी देखील त्यावर खुलासा केला आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

जया प्रदा यांनी त्या सीनमध्ये जे चुकीचं घडलं त्यासाठी दिलीप यांच्या कानशीलात लगावली होती. अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याविषयी दिलीप यांनी हे जे काही सुरु आहे ते खोटे आहे. अशा कोणत्याही प्रकारचा सीन शुट झाला नव्हता. त्यामुळे ती बाब खोटी आहे. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. माझी बदनामी जाणीवपूर्वक केली जात आहे. असेही ताहील यांनी म्हटले आहे.

तो चित्रपट होता आखिरी रास्ता. के भाग्यराज यांनी तो दिग्दर्शित केला होता. त्यात अमिताभ बच्चन, श्रीदेवी, अनुपम खेर, जया प्रदा आणि दिलीप ताहील यांच्या भूमिका होत्या. बॉलवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी आपल्याविषयी जे काही बोलले जात आहे ते चूकीचे असल्याचे म्हटले आहे.