'आता बरोबर एक वर्षाने...'; दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत Hemant Dhome | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhimma Director Hemant Dhome

'आता बरोबर एक वर्षाने...'; दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

Hemant Dhome: गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर ला 'झिम्मा'ने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी' लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे (Hemant Dhome)यांचा ‘सनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झिम्मा' नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी बरोबर एक वर्षांनी 'सनी'(Sunny) हा सिनेमा १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Jhimma Director Hemant Dhome Big Announcement, Post viral About his new 'Sunny' Movie)

हेही वाचा: आई बनल्यानंतर सोनम कपूरची पहिली प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'मी सेल्फिश...'

क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात 'सनी'ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे.

हेही वाचा: 'धर्मवीर मधील दीघे साहेबांची गोष्ट खोटी...'; प्रसाद ओक असं का म्हणाला? वाचा

दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतात, " 'झिम्मा' ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी' हा सिनेमा घेऊन आलोय.

आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे 'झिम्मा'ला प्रेम दिले तसेच ते 'सनी'ला हि मिळेल अशी खात्री आहे. "

Web Title: Jhimma Director Hemant Dhome Big Announcement Post Viral About His New Sunny

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..