Sharad Ponkshe: राहुल गांधींचं आडनाव खान ? पोंक्षेची मुक्ताफळे, आव्हाडांनी दिले खणखणीत प्रत्युत्तर

शरद पोंक्षेंनी राहुल गांधींच्या आडनावावरुन जे वक्तव्य केलं त्यावर जितेंद्र आव्हाडांनी टिका केलीय
jitendra awhad gave a dignified reply to sharad ponkshe about his statment on rahul gandhi surname
jitendra awhad gave a dignified reply to sharad ponkshe about his statment on rahul gandhi surname SAKAL

Jitendra Awhad on Sharad Ponkshe News: अभिनेते आणि निर्माते शरद पोंक्षे सतत विविध वक्तव्यांनी चर्चेत असतात. शरद पोंक्षेंना त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते.

शरद पोंक्षे खुपदा राजकीय टीकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे विविध स्तरांमधुन त्यांच्यावर टिकेची झोड उठते. सध्या असंच एक वक्तव्य केल्याने शरद पोंक्षेंवर कॉंग्रेस नेत्यांनी टिकेची झोड उठवली आहे.

jitendra awhad gave a dignified reply to sharad ponkshe about his statment on rahul gandhi surname
Ranbir Kapoor: अबब! रणबीर कपूरने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर, किंमत ऐकली तर घाम फुटेल

जितेंद्र आव्हाडांची शरद पोंक्षेंवर सडकून टिका

शरद पोंक्षेंनी मालेगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींसंदर्भात आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं. राहुल गांधींचं आडनाव गांधी नसुन खान आहे असं ते म्हणाले होते. यावर जितेंद्र आव्हाडांनी सडकून टिका केलीय.

"हा विकृत पोंक्षे अजुन काय बोलू शकतो नथुरामची अवलाद…" असं ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी शरद पोंक्षेंवर नाराजी व्यक्त केलीय.

शरद पोंक्षे राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते

अभिनेते शरद पोंक्षे नुकत्याच झालेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मालेगावला सहभागी होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या आडनावाबद्दल भाष्य केलं. शरद पोंक्षे म्हणाले, "राहुल गांधी हे गांधीही नाही अन् सावरकरही, ते मुळचे खान आहेत. त्यांनी महात्मा गांधीचे वंशज नसताना देखील त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला. आताचे गांधी हे फिरोज खान यांची पुढची पिलावळे असून राहुल गांधी यांचे मूळ नाव 'खान' आहे." असी जहरी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर केली.

jitendra awhad gave a dignified reply to sharad ponkshe about his statment on rahul gandhi surname
Zareen Khan: सलमान खानची हिरोईन झरीन खान हॉस्पीटलमध्ये दाखल, समोर आलं मोठं कारण

या तारखेपासुन शरद पोंक्षे सुरु होणार नाटकाचे प्रयोग

शरद पोंक्षेंनी स्वातंत्र्यदिनी खुलासा केला की, "माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही.

त्यामुळेच मग मी फक्त ५० प्रयोगांसाठी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर २०२३ संपूर्ण महाराष्ट्रात मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे प्रयोग करणार आहे”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com