
Jitendra Joshi: जितू सुटाबुटात एकदम कदम..! बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये जितूचा हा मराठी सिनेमा झळकणार
Jitendra Joshi News: मराठी सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल होणं हि सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या मानाच्या अशा बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली आहे.
या फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या सिनेमाचा प्रवेश मिळवणं हि प्रत्येक फिल्ममेकर साठी आनंदाची गोष्ट असते. याच फिल्म फेस्टिवलमध्ये आता एक मराठी सिनेमा सहभागी झालाय.
जितेंद्र जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्यानिमित्ताने जितू बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये गेलाय.
(jitendra joshi at berlin film festival 2023)
जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर बर्लिन फिल्म फेस्टिवलचे फोटो पोस्ट केलेत. या फेस्टिवलमध्ये जितू सुटाबुटात एकदम कडक दिसतोय. जितूचा आगामी महत्वाचा सिनेमा या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे घाट.
जितेंद्र जोशी आणि मिलिंद शिंदे अशा कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. छत्रपाल निनावे यांनी घाट चं लेखन - दिग्दर्शन केलंय.
जितेंद्र जोशीने त्याचा बर्लिन फिल्म फेस्टिवलमधला अनुभव सोशल मीडियावर शेयर केलाय. जितू लिहितो.. "माझ्या आयुष्यातील आणखी एक अविस्मरणीय रात्र!!! जगभरातील सुरेख कपडे घातलेले स्त्री-पुरुष आणि सिनेमाबद्दल प्रेम आणि उत्कट मन.
पीटर डिंकलेज आणि ऍना हाथवे यांचा SHE CAME TO ME हा शानदार ओपनिंग सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. हा एक अतिशय उत्तम लेखन आणि सादर केलेला सिनेमा होता.
आणि अर्थातच पार्टीनंतर बर्लिनच्या रस्त्यावर पावसाच्या काही लहान थेंबांसह फिरायला मिळाले. आय लव्ह यू सिनेमा.. माझ्यासारख्या अनेक सामान्य लोकांना तुम्ही प्रवास करायला लावले आणि अनेक असामान्य लोक आणि ठिकाणांजवळ बसवले.
घाट साठी माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद.. छत्रपाल निनावे आणि शिलादित्य बोरा तुमचे अभिनंदन.
तुम्ही एक योग्य सिनेमा विकत घेतला ज्याचा प्रीमियर 22 फेब्रुवारी रोजी बर्लिन येथे होईल. इतर सिने रसिकांसह आमचा सिनेमा सुद्धा साजरा करूया. अशी खास पोस्ट लिहून जितूने त्याचा बर्लिन फिल्म फेस्टिवलमधला अनुभव सर्वांना सांगितला."
जितेंद्र जोशीचा याआधीचा गोदावरी सिनेमा प्रचंड गाजला. जितेंद्रच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. आता बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रीनिंग होत असलेल्या जितूच्या घाट सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.