Defamation Suit : जॉनी डेप, अ‍ॅम्बर हर्डवर चित्रपट; ३० सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मानहानीचा खटला या वर्षातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला
Johnny Depp, Amber Heard News
Johnny Depp, Amber Heard NewsJohnny Depp, Amber Heard News

Johnny Depp, Amber Heard News जॉनी डेप (Johnny Depp) आणि माजी पत्नी अ‍ॅम्बर हर्ड यांचा मानहानीचा खटला या वर्षातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. अभिनेत्याने माजी पत्नी हर्डविरुद्ध (Amber Heard) दाखल केलेला खटला जिंकला आहे. या वादग्रस्त मानहानीच्या खटल्यावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट येणार आहे. ‘हॉट टेक : द डेप्थ/हर्ड ट्रायल’ नावाचा फीचर चित्रपट (Movie) ३० सप्टेंबर रोजी Tubi स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर विनामूल्य प्रदर्शित होईल.

‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’मध्ये जॉनी डेपच्या भूमिकेत मार्क हापका आणि ॲम्बर हर्डच्या भूमिकेत मेगन डेव्हिस असणार आहे. डेपच्या (Johnny Depp) वकीलच्या भूमिकेत केमिली वास्क्वेझ असतील तर मेरी कॅरीग हर्डची वकील एलेन ब्रीडहॉफ्टच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटात जॉनी आणि ॲम्बर हर्डचे जीवन आणि १ जूनपर्यंत चाललेला मानहानीचा खटला दाखवण्यात येणार आहे.

Johnny Depp, Amber Heard News
PM Narendra Modi Birthday : ‘या’ कलाकारांनी साकारली पंतप्रधानांची भूमिका

हॉट टेक हा फॉक्स एंटरटेनमेंटच्या मारविस्टा एंटरटेनमेंटचा चित्रपट आहे. हा चित्रपट गाय निकोलूची यांनी लिहिला आहे. सारा लोहमनने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची निर्मिती ब्रिटनी क्लेमन्स, अँजी डे, मारियान सी व्हॅंच, हॅना पिल्मर आणि फर्नांडो झे यांनी केली आहे. ऑटम फेडेरिकी आणि क्रिस्टोफर सिविजटिक यांनी निर्माते म्हणून त्यांच्या नवव्या हाउस बॅनरखाली काम केले.

जॉनीने जिंकला मानहानीचा खटला

जॉनी डेप आणि ॲम्बर हर्ड (Amber Heard) यांची भेट २०११ मध्ये ‘द रम डायरी’च्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. फेब्रुवारी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. एक वर्षानंतर २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर जॉनी डेपने २०१८च्या वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात ॲम्बर हर्डची बदनामी केल्याबद्दल दावा दाखल केला होता. ज्यामध्ये तिने स्वत:ला घरगुती अत्याचाराचा बळी म्हणून वर्णन केले. यानंतर जॉनीने मानहानीचा खटला जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com