Jr NTR बर्थ डे, फॅन्सला रिटर्न गिफ्ट, RRR च्या Komaram Bheem चा नवा लुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

komram bheem

Jr NTR बर्थ डे, फॅन्सला रिटर्न गिफ्ट, RRR च्या Komaram Bheem नवा लुक

मुंबई - टॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता म्हणून ज्युनिअर एनटीआरची ओळख आहे. आज त्याचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्य़ाच्या आगामी आणि बहुचर्चित अशा आरआरआर चित्रपटाच्या नव्या लुकचे सरप्राईज गिफ्ट त्याला देण्यात आले आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला एनटीआरच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आरआरआर सिनेमाविषयी खूप चर्चा केली गेली आहे. एनटीआरला त्याच्या चाहत्यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

ज्युनिअर नटराजनच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्याला त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक गिफ्ट दिलं आहे. त्याचे कौतूक होत आहे. त्या चित्रपटामध्ये एनटीआरनं भीमची भूमिका साकारली आहे. साऊथ चित्रपटामधील सुपरस्टार म्हणून एनटीआरचे नाव घेतले जाते. तो आज 20 मे रोजी आपला 38 वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरआरआरची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात एनटीआरचा कडक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एनटीआरनं आरआरआरमध्ये कोमाराम भीमची भूमिका साकारली आहे. कोमाराम भीम यांनी हैद्राबाद मुक्तिसाठी लढा दिला होता. त्यासाठी त्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा दिला. मोठा संघर्षही केला. त्याला अखेर यश मिळाले. मात्र त्यासाठी भीम यांना मोठी किंमत चूकवावी लागली. कोमराम भीममध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्यात आली आहे. ज्यात कोमारामनं हातात भाला पकडला आहे आणि तो रागात असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: नुसरतनं मेडिकल स्टोअरवर जे विकलं त्याची झाली चर्चा...

हेही वाचा: अरिजित सिंगला मातृशोक; कोरोनामुळे निधन

एनटीआरनं स्वत तो लूक शेअर केला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या त्या लूकचे सगळीकडे कौतूकही होताना दिसत आहे. त्या लूकबद्दल व्टिट करताना त्यानं लिहिलं आहे की, तो एक लढवय्या आहे. त्याची भूमिका साकारणं आव्हानात्मक होते.

Web Title: Jr Ntr Gave Return Gift To Fans On Birthday Komaram Bheems Look From

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top