कंबर मोडली,हातानं धड जेवताही येईना... तरीही...Jubin Nautiyal Health Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jubin Nautiyal gives health update from hospital says got discharged and am recovering

Jubin Nautiyal Health Update: कंबर मोडली,हातानं धड जेवताही येईना... तरीही...

Jubin Nautiyal: बॉलीवूडला कितीतरी हिट गाणी देणारा गायक ज्युबिन नौटियाल जखमी झाल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. ज्युबिन आपल्या घरातील जिन्यांवरनं पडला होता,ज्यानंतर तो जबरदस्त जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. बोललं जात होतं की त्याच्या हाडांमध्ये क्रॅक आला आहे. एवढंच नाही,तर डोक्याला देखील मोठी दुखापत झाली होती. आता गायकाने आपली हेल्थ अपडेट दिली आहे. त्याच्या प्रकृतीविषयीची मोठी हेल्थ अपडेट समोर आली आहे. (Jubin Natiyal gives health update from hospital says got discharged and am recovering)

'तू सामने आए', 'मानिके','बना शराबी..' सारख्या एकापेक्षा एक सुरेल गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करणारा गायक ज्युबिन नौटियालच्या पीआरनं सांगितलं होतं की शुक्रवारी २ डिसेंबर रोजी घरातील जीन्यांवरनं पाय घसरून ज्युबिन पडला होता. शरीराला अनेक ठिकाणी जखम झाल्या कारणानं डॉक्टरनं त्याच्या उजव्या हाताला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. पण आता गायकाने ट्वीटरवर हेल्थ अपडेट दिली आहे आणि आपला एक फोटो देखील त्यानं जखमी अवस्थेतला शेअर केला आहे,ज्यामध्ये तो सध्या तरी पूर्ण बरा आहे असं काही चित्र दिसत नाहीय.

ज्युबिन नौटियालने ट्वीटरवर आपला एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''तुमच्या आशीर्वादांसाठी मी खूप खूप आभारी आहे तुमचा. देवाची माझ्यावर कृपा होती आणि आता मी ठीक होत आहे. आपल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद''. फोटोत ज्युबिन हॉस्पिटलच्या बेडवर बसला आहे. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. तो आपल्या डाव्या हातानं जेवत आहे,आणि कॅमेऱ्याच्या दिशेने त्याची नजर आहे. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू मात्र आहे. त्याला पाहून आता त्याच्या चाहत्यांच्या मनाला शांती मिळाली आहे.

हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास

पीआरनं सांगितलं होतं की ज्युबिन नौटियालच्या हाताला जबरदस्त मार लागला होता,इतपत की हाताचं हाड मोडल्याचं समोर आलं. त्याच्या डोक्याला देखील लागल्याचं कळलं होतं. यानंतर त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टर्सनी गायकाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता पण फोटो पाहून वाटत आहे की ज्युबिन आता ठीक आहे. तसंच,हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर तो त्याच्या होमटाऊनला जाणार आहे. डॉक्टर्सनी त्याला प्लास्टर केलेल्या हाताची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.