4 वर्ष सिनेमांपासून का दूर राहिला शाहरुख?, खुलासा करताना सुहानाचं नाव घेत म्हणाला...Shahrukh Khan: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan has now revealed that he did not take up any work during last 4 years

Shahrukh Khan: 4 वर्ष सिनेमांपासून का दूर राहिला शाहरुख?, खुलासा करताना सुहानाचं नाव घेत म्हणाला...

Shahrukh Khan: शाहरुख खान तब्बल ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. आता शाहरुखची मुलगी सुहाना खानही पुढील वर्षी २०२३ मध्ये बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. आता शाहरुख खाननं सांगितलं की जेव्हा सुहाना अमेरिकेला गेली होती तेव्हा त्यानं काहीच काम हाती घेतलं नाही. कारण त्यावेळी शाहरुखला वाटत होतं की सुहानाला अमेरिकेत एकटेपणा जाणवू लागला तर त्याला कधीही तिच्याजवळ जावे लागेल. (Shahrukh Khan has now revealed that he did not take up any work during last 4 years)

शाहरुखनं याविषयीचा खुलासा नुकताच सौदी अरेबियात झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दरम्यान केला आहे. शाहरुख खानचा सिनेमा 'पठाण' पुढील वर्षी रिलीज होणार आहे आणि त्याची मुलगी सुहाना देखील झोया अख्तरच्या 'द आर्चीज' सिनेमातनं पदार्पण करणार आहे. सुहानाचा हा सिनेमा पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला की,''सुहानानं मला कधीच कॉल केला नाही. मी कितीतरी सिनेमे तिच्या फोनच्या प्रतिक्षेत साइन केले नाहीत आणि विचार करत राहिलो की कदाचित ती मला आता कॉल करेल,मग कॉल करेल, तिला माझी केव्हाही गरज लागेल. मग एकदा मीच तिला फोन केला आणि तिला म्हटलं की,'मी माझं काम सुरु करू का?', तेव्हा सुहाना म्हणाली,'तुम्ही काम का नाही करत?'. मी म्हणालो,मला वाटलं की तुला अमेरिकेत एकटेपणा वाटेल तर कदाचित तू मला फोन करशील''.

सुहाना फिल्म संबंधित कोर्स करण्यासाठी लंडनमधून अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सुहानानं 'द आर्चिस'चं शूटिंग बऱ्यापैकी पूर्ण केलं आहे. तर काही दिवसांपूर्वी दिवाळी पार्टीतल्या तिच्या ग्लॅमरस फोटोंची बरीच चर्चा झाली होती. शाहरुख खाननं मुलीला साडीत पाहिल्यावर विचारलं होतं की,'तिनं स्वतः ही साडी नेसली आहे का?'. तेव्हा सुहाना म्हणाली होती की,'या साडीला नेसायला तिला आई गौरीनं मदत केली आहे'.

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा देखील चर्चेत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदूकोण मध्यवर्ती भूमिकेत आहे. सिद्धार्थ आनंदच्या या सिनेमात जॉन अब्राहम देखील असणार आहे. पुढील वर्षी २५ जानेवारीला सिनेमा जगभरात रिलीज केला जाणार आहे. याव्यतिरिक्त 'जवान' या अॅक्शन सिनेमात देखील शाहरुख नजरेस पडेल.