जुडवा2 हा सहकुटुंब पाहण्याजोगा चित्रपट- वरूण धवन; जुडवा2चा ट्रेलर आला

टीम ई सकाळ
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

डेव्हीड धवन दिग्दर्शित जुडवा 2 ची प्रतिक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला. वरूण धवन, तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस आणि डेव्हिड धवन ही मंडळी यावेळी हजर होती. विशेष बाब अशी की या कार्यक्रमाचे लाईव्ह जु़डवाच्या पेजवरून झाले. हा सिनेमा हा संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असा बनवण्यात आला आहे. मी जुडवा हा चित्रपट लहानपणी पाहीला आहे. त्यावेळी मला तो खूप आवडलाही होता. आता जुडवा2 हा सिनेमा लोकांना खूप आवडेल अशी पावती वरूणने दिली. 

मुंबई : डेव्हीड धवन दिग्दर्शित जुडवा 2 ची प्रतिक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आज या सिनेमाचा ट्रेलर लाॅंच झाला. वरूण धवन, तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस आणि डेव्हिड धवन ही मंडळी यावेळी हजर होती. विशेष बाब अशी की या कार्यक्रमाचे लाईव्ह जु़डवाच्या पेजवरून झाले. हा सिनेमा हा संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असा बनवण्यात आला आहे. मी जुडवा हा चित्रपट लहानपणी पाहीला आहे. त्यावेळी मला तो खूप आवडलाही होता. आता जुडवा2 हा सिनेमा लोकांना खूप आवडेल अशी पावती वरूणने दिली. 

जुडवा 2 चा ट्रेलर

यावेळी ट्रेलर तर लाॅंच झालाच. शिवाय आपल्या आठवणीही अनेकांनी शेअर केल्या. तापसी म्हणाली, डेव्हीड सरांसोबत काम करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काम करताना मला खूप मजाही आली. जॅकलिनचा अनुभवही फार वेगळा नव्हता. ती म्हणाली, मी जुडवा पाहिला आहे. त्यात करिष्माने जो रोल केला आहे, तो मी करते आहे, त्यामुळे जबाबदारी खूप वाढली आहे. 

डेव्हीड यांनी यावेळी सलमानचं खूप कौतूक केलं. त्यांना गोविंदाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गोविंदा हा एक मोठा कलाकार आहे असं म्हणून त्यांनी तो विषय टाळला. हा सिनेमा लोकांना खूप आवडेल. हा सिनेमा दसऱ्याला म्हणजेच 29 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Judwaa2 trailer launch movie esakal news