जुग जुग जियो: वरुण-नीतूनंतर मनीष पॉलला देखील कोरोना व्हायरसची लागण, शूटींग सोडून परतला घरी

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 7 December 2020

'जुग जुग जियो' सिनेमाचं शूटींग देखील थांबलं आहे. आता अशी बातमी समोर येतेय की जुग जुग जियोच्या स्टारकास्टमध्ये आणखी एक अभिनेता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.  

मुंबई- वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर 'जुग जुग जियो' सिनेमाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली होती की सिनेमाच्या स्टारकास्टमधील वरुण धवन आणि नीतू कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तीघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. अशातंच सिनेमाचं शूटींग देखील थांबलं आहे. आता अशी बातमी समोर येतेय की 'जुग जुग जियो'च्या स्टारकास्टमध्ये आणखी एक अभिनेता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे.  

हे ही वाचा: अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा बोल्ड अंदाज, पाहा कुठे काढलाय टॅटू

आता अभिनेता मनीष पॉलचा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मनीष पॉलला जसं त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं समजलं तसा तो लगेचच शूटींगच्या सेटवरुन मुंबईत त्याच्या घरी परतला आणि स्वतःला क्वारंटाईन केल्याचं समजतंय. मात्र या बातमीवर मनीष पॉल आणि आणि त्याच्या टीमकडून आत्तापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही वरुण धवन, नीतू कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांच्यानंतर आता 'जुग जुग जियो' सिनेमाच्या टीममधील मनीष पॉल ही चौथी व्यक्ती आहे ज्याला कोरोनाची लागण झाली आहे. 

याआधी अभिनेते अनिल कपूर यांच्याबाबत देखील अशीच बातमी समोर आली होती की त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. ज्यानंतर अनिल कपूर यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देत हे चूकीचं असल्याचं म्हटलं होतं. अनिल कपूर यांनी ट्विट करत स्पष्ट केलं की ते कोरोना व्हायरस संक्रमित नाही आहेत. तर अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरने देखील त्या अफवांवर प्रतिक्रया देत नाराजी व्यक्त केली होती.    

jug jug jiyo after varun dhawan and neetu kapoor actor maniesh paul tested positive for covid 19  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jug jug jiyo after varun dhawan and neetu kapoor actor maniesh paul tested positive for covid 19