अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा बोल्ड अंदाज, पाहा कुठे काढलाय टॅटू

gorgia
gorgia

मुंबई- इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रिया खूप दिवसांपासून चर्चेत आहे. अरबाज खानसोबत असलेली तिची रिलेशनशिप हा या चर्चेचा मुद्दा आहे. सोशल मिडियावर जॉर्जिया चांगलीच ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करताना दिसते. मात्र जेव्हापासून अरबाजसोबत तिचं नाव जोडलं आहे ती सगळ्यांच्या नजरेत आलीये. मलाईका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज आणि जॉर्जियाच्या लग्नाच्या अनेक चर्चा झाल्या. दोघांनी त्यांची रिलेशनशिप मिडियापासून लपवली नसली तरी आत्तपर्यंत लग्नाबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. या दरम्यान आता जॉर्जियाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

जॉर्जिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात असते. तिचे फोटो अपडेट ती चाहत्यांना देत असते. असेच काही फोटो तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. जॉर्जियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच हिट ठरतायेत. ४ तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना आत्तापर्यंत ११ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये जॉर्जियाच्या टॅटूने सगळं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने पायांच्या मांडीवर मागच्या बाजूला बो असलेला असा कलर टॅटू काढला आहे. हा टॅटू फ्लॉन्ट करताना तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. 

काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानीने अरबाजसोबत लग्न करण्याच्या चर्चांवर मौन सोडंल होतं. जॉर्जियाच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या अफवांनी काही फरक पडत नाही. कारण त्यांनी आत्तापर्यंत रिलेशनशिप कोणापासून लपवलेली नाहीये. मात्र जेव्हा कधी तुम्ही अशा व्यक्तीसोबत जोडले जाता जो लोकप्रिय आहे तेव्हा तुमच्याविषयी चर्चा होणं ही सामान्य बाब आहे.   

arbaaz khan girl friend georgia andriani show their bold style  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com