जुही नात्याने त्या अभिनेत्याची आंटी;पण तो तिच्या प्रेमात होता

स्वतः अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर करीत सांगितला किस्सा...
Juhi Chawla
Juhi ChawlaInstagram
Updated on

जुही चावला(Juhi Chawla) म्हणजे सुंदर दिसणं,मधाळ हसणं,उत्तम अभिनय असं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. वयाच्या साठीच्या दिशेने तिचा प्रवास सुरू असला तरी तिच्या तारुण्यात तिच्यावर फीदा असणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. म्हणजे आजही तिच्या दिसण्यावर घायाळ होणारे काही कमी नाहीत हे ही तितकच खरं. इतकं मेंटेन तिनं आजही स्वतःला ठेवलेलं आहे बरं का. पण तुम्हाला माहित आहे का,तिच्या तारुण्यात तिला आंटी म्हणणाऱ्या एका लहानग्यानं तिला प्रपोज केलं होतं. तो पुढे जाऊन आजच्या पिढीतला उत्तम अभिनेता बनलाय ही एक विशेष गोष्ट आहे. जुहीला त्यानं प्रपोज केले होते तेव्हा त्याचं वय होतं अवघं सहा वर्षाचं. आमिर खानला तो मामू म्हणायचा. आता थोडं थोडं त्या अभिनेत्याविषयी लक्षात आलं असेलच आपल्या. हो,जुहीला प्रपोज करणाऱ्या त्या अभिनेत्याचं नाव आहे इमरान खान. नेमका किस्सा जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

इमराम खान हा आमिर खानच्या बहिणीचा मुलगा. नात्याने आमिर त्याचा मामा. तो आमिरच्या अनेक सेटवर हजेरी लावायचा. इतकंच नाही तर काही सिनेमातून त्यानं आमिरच्या लहानपणीची देखील भूमिका साकारलीय. आमिर-जुहीचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'कयामत से कयामत तक' यामध्ये इमरानने आमिरच्या लहानपणीची व्यक्तीरेखा साकारली आहे. तो त्यामुळे सेटवर असायचाच. तिथेच त्याची भेट जुहीशी झाली. त्याला जुही आवडू लागली. तो तिला 'आंटी' म्हणायचा खरं पण कोणाला माहीत त्या इवल्याशा मुलाच्या मनात का शिजतंय ते. त्यानं एकदा सरळ जुहीला प्रपोज केलं. ते पाहून जुही थोडी शॉक्ड झाली. पण तिनं त्याला समजावलं की मी तुझी आंटी आहे. हा किस्सा स्वतः जुहीनं तिच्या इन्स्टाग्रामवर इमरानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देताना शेअर केला आहे. तिनं कॅप्शनमध्ये विशेष म्हटलंय की इमरानला लहानपणापासूनच 'खरा हिरा' ओळखता येतो.

Juhi Chawla
करिनाला मुलांसोबत नाही; तर याठिकाणी वेळ घालवायला अधिक आवडते

तिनं केलेली पोस्ट आम्ही इथं बातमीत जोडत आहोत. इमराननं 'जाने तू या जाने ना' या सिनेमातनं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा हीट ठरला. या सिनेमात त्यााच्यासोबत जेनेलिया डिसोझाही होती. त्यानंतर त्याने अनेक सिनेमे केले.शेवटचा तो २०१५ मध्ये 'कट्टी बट्टी' सिनेमात दिसला पण त्यानंतर त्यानं बॉलीवूड पासून फारकत घेतली. त्याचं वैय़क्तिक आयुष्यही ठिकठाक सुरू नसल्याच्या बातम्या आहेत. जुही चावला देखील आपल्याला २०१७ मध्ये 'द टेस्ट केस' या वेबसिरीजमध्ये दिसली होती. तर २०१७ मध्ये 'चॉक द डस्टर' या सिरीजमध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com