करिनाला मुलांसोबत नाही; तर याठिकाणी वेळ घालवायला अधिक आवडते Kareena kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kareena Kapoor-Khan

करिनाला मुलांसोबत नाही; तर याठिकाणी वेळ घालवायला अधिक आवडते

मध्यंतरी करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावून आलेल्या करिना कपूरला(Kareena Kapoor) कोरोनाची लागण झाली अन् ती लगोलग चर्चेत आली. मुंबई महानगरपालिकेनंही तिला बेजबाबदार नागरिक म्हणून संबोधलं. यावर करिनानं आपण कोव्हिड काळात कसे जबाबदार नागरिक होतो याचे पाढे वाचले महानगरपालिकेसमोर. पण तेव्हढ्यानं शहाणपण येईल ते सेलिब्रिटी कुठले. पुन्हा कोरोनातून बरे झाल्यावर सात-आठ दिवसांत तिनं आपल्या मोठ्या बहिणीच्या म्हणजे करिष्माच्या घरी आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत हजेरी लावली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर ताशेरे ओढले गेले. आता पुन्हा तिची चर्चा होतेय ते तिने घरातील तिच्या एका फेव्हरेट जागेचे फोटो शेअर केले त्यावरनं. तिनं ती गोष्ट आपली फेव्हरेट आहे,तिथे वेळ घालवायला आपल्याला आवडतं असं म्हटलंय. आता लोकांना अपेक्षित होतं बाई आपल्या मुलांच्या रुमला फेव्हरेट जागा म्हणतील,जिथे वेळ घालवायला,मुलांसोबत खेळायला आवडतं असं करिना म्हणेल. पण तसं काहीही तिनं म्हटलं नाही.

हेही वाचा: सुशांत सिंग राजपूतवर बायोपीक? बहिण प्रियंकानं नोंदवला आक्षेप

करिनानं इन्स्टाग्रामवर घरातील स्वतःच्या फेव्हरेट जागेचे फोटो शेअर केले आहेत. ती जागा आहे तिची योगा करण्याची. अर्थात तिनं तिच्या योगा मॅटला 'फेव्हरेट' म्हटलं आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर करिनाचं वजनं वाढलं आहे. पण आता हळूहळू ती तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसतेय. तशी ती फिटनसे फ्रीक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीय. सोशल मीडियावर ती नेहमी तसे एक्सरसाईज करतानाचे व्हिडीओ-फोटो शेअर करीत असते. नुकताच तिनं तिच्या त्या आवडत्या योगा मॅटवर बसलेला तिचा एक फोटो शेअर करीत त्याला कॅप्शन दिलंय,“Back at my most favourite spot… My yoga mat, with my favourite girl. Long road ahead but we can do this. Oh! Is that my car at the back?” करिनानं ही पोस्ट आपली योगा इन्स्ट्रक्टर अनुष्का पारवानीला टॅग केली आहे.

करिनानं शेअर केलेल्या फोटोत जी कार आहे ती तिचा मोठा मुलगा तैमूरची असावी बहुधा. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करताना लिहिलंय की,'पू इज बॅक',तर कुणी लिहिलंय,'फोटोतली कार खूप मस्त आहे'. 2020 मध्ये करिनाची अंग्रजी मीडियम फिल्म आपल्या भेटीस आली होती. त्यांनतर आता ती दिसणार आहे आमिर खानच्या लालसिंग चड्डा या सिनेमात. या सिनेमातील काही सीन्स करिना दुसऱ्या मुलाच्या वेळेस प्रेग्नेंट असतानाच शूट करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top