Hailey Bieber Pregnant: जस्टिन बिबरच्या घरी येणार 'बेबी'! हेली देणार गुडन्यूज?

Hailey Bieber Pregnant
Hailey Bieber PregnantEsakal

हॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा जास्त लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा जस्टिन बिबर हा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो आपल्या मधुर आवाजानं जगभरातील तरुणाईला भुरळ घालतो. आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला. लवकरच सिंगर जस्टिन बीबर यांच्या घरी पाहुणा येणार आहे.

जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबर ही गरोदर असल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हेलीचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यासोबतच जस्टिन आणि हेलीचा एक ऑडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यात ते प्रेग्नेंसीबद्दल बोलत आहे.

Hailey Bieber Pregnant:
Hailey Bieber Pregnant:
Hailey Bieber Pregnant
Swanandi-Ashish Wedding: "लक्ष असू द्या बाबाजी," स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार? वडिलांनीच केला खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरु होत्या. हेली गेल्या रविवारी जस्टीनसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिने क्रॉप टॉप घातला होता. या कार्यक्रमाच्या फोटोत तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. त्यासोबतच जस्टिन आणि हेलीच्या फॅनपेजवर एक व्हिडिओ आहे ज्यात ते येणाऱ्या बाळाबद्दल बोलत आहेत.

Hailey Bieber Pregnant
Zinda Banda Jawan: शाहरुखच्या जवानमध्ये मराठमोळ्या गिरीजा ओकचा जबरी डान्स! जिंदा बंदामध्ये चमकली

सप्टेंबर 2018 मध्ये जस्टिन आणि हेलीनं लग्न केलं. त्यातच एका मुलाखतीत जस्टिनने त्याला मूलं हवे आहे असं सांगितलं तर दुसरीकडे हेलीने ती आता यासाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं.

Hailey Bieber Pregnant
Bigg Boss OTT 2: बिग बॉसच्या घरातच उरकला जिया अभिषेकचा साखरपूडा? व्हिडिओ व्हायरल

जस्टिन बीबर बद्दल सांगायचं झालं तर त्याची आई अवघ्या 17 वर्षांची असतांना जस्टीनचा जन्म झाला. जस्टिनची आई पॅट्रिशिया 'पॅटी' मेलेट आणि वडील जेरेमी जॅक बीबर यांनी लग्न केलेल नाही.

जस्टिन बीबरची लोकप्रियता भारतातही खूप आहे. लहानवयातच त्याने खुप प्रसिद्ध मिळवली आहे. जस्टिनने वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून गाणं गायला सुरुवात केली. आता तो खुप प्रसिद्ध आणि लोकप्रिय सिंगर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com