Mrs India Beauty Pageant 2023: अन् भारताला मिळाली 'मिसेस इंडिया', ज्योती अरोराने पटकावला मानाचा किताब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mrs India Beauty Pageant 2023, mrs india winner, jyoti arora mrs india

Mrs India Beauty Pageant 2023: अन् भारताला मिळाली 'मिसेस इंडिया', ज्योती अरोराने पटकावला मानाचा किताब

Jyoti Arora Mrs India News: अकरा वर्षांपासून एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा म्हणून 'मिसेस इंडिया पेजंट' सौंदर्य स्पर्धेला ओळखले जाते. या वर्षी सुद्धा या स्पर्धेची सर्वांना उत्सुकता होती.

'मिसेस इंडिया पेजेंट' हे भारतातील विवाहित महिलांसाठीचे हक्काचे व्यासपीठ आहे. या वर्षी हा कार्यक्रम इरॉस हॉटेल, दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

या ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये ज्योती अरोरा 'मिसेस इंडिया'ची विजेती ठरली. ज्योतिषी आणि फेंगशुई मास्टर ज्योती अरोरा यांनी 'मिसेस' ही पदवी जिंकली.

(jyoti arora become winner of Mrs India Beauty Pageant 2023)

ज्योतिषी आणि फेंगशुई मास्टर ज्योती अरोरा यांनी 'मिसेस इंडिया' ही स्पर्धा जिंकली. क्लासिक सौंदर्य स्पर्धेत ज्योती अरोराने मिसेस इंडीया हा किताब पटकावला. 18 मार्च 2023 रोजी इंडिया ब्युटी पेजंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ज्योतीने हि स्पर्धा जिंकल्याने तिच्या डोक्यावर विजेत्याचा मुकुट सजवण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान भारताच्या संचालिका दीपाली फडणीस याशिवाय आजी माजी विजेत्यांनी भाग घेतला होता.

'मिसेस इंडिया पेजंट'च्या संचालिका दीपाली फडणीस यांनी या कार्यक्रमात महत्त्वाची घोषणा केली. 'मिसेस इंडिया'ची विजेती ज्योती अरोरा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे दिग्दर्शक दीपाली यांनी सांगितले.

ती 'मिसेस एशिया इंटरनॅशनल'मध्ये जगभरातील सौंदर्यवतींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

'मिसेस इंडिया' सौंदर्य स्पर्धेत विजेती झालेली ज्योती अरोरा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ज्योतीने देश-विदेशात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

सर्व TV चॅनलवर, ज्योतीने सांगिततेले राशीचक्र आणि भविष्य आणि हेल्थ विषयांशी संबंधित असलेले फेंगशुई कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहेत. ज्योती शालेय शिक्षणाच्या बाबतीत पुरुषांना मुलींसारखेच अधिकार देण्याचे समर्थन करतात.

कॉर्पोरेट कामात ज्योती यांना 13 वर्षांचा अनुभव असून त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. ज्योतीने प्रसिद्ध ज्योतिष म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केले आहेत.

टॅग्स :Marathi News Bollywood