के एल राहुल निवांत वेळ घालवतोय 'या' बॉलिवूड अभिनेत्री सोबत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नुकताच डिनर करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम वरील राहुलच्या फॅन पेज वर हे फोटो अपलोड करण्यात आले आहे. 

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं तसं जुनं आहे. अशी आणखी एक जोडी सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे के एल राहुल आणि निधी अग्रवाल. 

आयपीएल 2018 मध्ये सातत्याने उत्तम परफॉर्मन्स दिलेला किंग्ज् इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू के एल राहुल सध्या आपली निवांत वेळ अभिनेत्री निधी अग्रवाल सोबत घालवत आहे. नुकताच डिनर करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम वरील राहुलच्या फॅन पेज वर हे फोटो अपलोड करण्यात आले आहे. 
 

अफगाणिस्तान विरुध्द 14 जुन ला होणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी राहुल भारतीय संघात सामिल आहे. के एल राहुलने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. जेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरुध्द त्याने 14 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. सलामीचा फलंदाज म्हणून त्याने उत्तम कामगिरी केली आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: K L Rahul was spotted having dinner with Bollywood Actress Nidhhi Agerwal